जळोची येथील 50 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप



बारामती : सहकारनामा ऑनलाईन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जळोची येथील रोजंदारीवर काम करणारे कामगार व मजूर अडचणीत आले आहेत. या कामगारांची अडचण लक्षात घेऊन रोजंदारीवर कार्यरत 50 कुटुंबांना पत्रकार स्वप्निल कांबळे,अभिमान लोंढे,आकाश बगाडे,प्रविण कांबळे,निलेश कांबळे,प्रशांत कांबळे, पोपट गायकवाड यांनी जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप केले. लॉकडाऊनमुळे निव्वळ रोजंदारीवर व हातावर पोट असलेल्या कुटुंबांची मोठी गैरसोय होत आहे.सामाजिक बांधिलकी जपत सामाजाचे आपण देणे लागतो ह्या उद्देशाने ही मदत केल्याचे पत्रकार स्वप्निल कांबळे यांनी सांगीतले.

या जीवनावश्यक वस्तूंच्या किट मध्ये गहू,तांदूळ,साखर,चहापावडर,कडधान्ये,साबन,तेल,डाळी अशा दहा वस्तूंचा समावेश आहे.सर्व कुटुंबांना वस्तू घरपोच करण्यात आल्या. तसेच या ५० कुटुंबांना कोरोना महामारी पाहता किट बरोबर घरी रहा सुरक्षित रहा सांगत कोरोनाशी लढण्यास शासनाच्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले.