कोरोना काळात सेवा दिलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये 50 % कोटा राखीव ठेवण्याची आ.कुल यांची मागणी



पुणे : सहकारनामा 

कोरोना काळात शासकीय रुग्णालये, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर मध्ये सेवा दिलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना अंशकालीन घोषीत करणे तसेच सरकारी सेवेमध्ये सामावून घेणेसाठी ५०% कोटा राखीव  ठेवणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पत्राद्वारे विनंती केली आहे.

महाराष्ट्र व पर्यायाने संपूर्ण जगभरात कोरोनाने थैमान घातले असता शासकीय कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने हजारो कंत्राटी कर्मचारी ज्यामध्ये नर्सेस, सफाई कर्मचारी, रुग्णवाहिका चालक आदींनी जीवाची बाजी लावून कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी काम करत हजारो रुग्णांचे प्राण वाचवले आहेत.

देश व महाराष्ट्रातच्या हितासाठी हजारो रुग्णांना सेवा देणाऱ्या या कंत्राटी कामगारांच्या सेवेची दखल घेऊन कोरोना काळात शासकीय रुग्णालये, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर मध्ये सेवा दिलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने अंशकालीन घोषीत करून त्यांना शासकीय आरोग्य सेवेत कायम करणे बाबत सहानुभूतीने विचार करावा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे. 

मलेरियाच्या धर्तीवर सध्या अस्तित्वात असणाऱ्या आरक्षणाच्या धर्तीवर कोरोना काळात शासकीय रुग्णालये, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर मध्ये सेवा कर्तव्य बजावणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागातील भरती मध्ये ५० % कोटा राखीव ठेवण्यात यावेत अशीही मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.