पुणे : सहकारनामा ऑनलाईन
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (एल.सी.बी.) पथकाने यवत पोलीस स्टेशन हद्दीत यवत सहकारनगर येथे अलिशान कारमध्ये व घरात चालणाऱ्या मटका अड्डयावर छापा टाकून ५ आरोपींवर कारवाई करून किंमत रुपये ५,३२,६२५/- (पाच लाख बत्तीस हजार सहाशे पंचवीस) चा माल जप्त केल्याची माहीती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली.
पुणे ग्रामीण जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करणेसाठी पुणे जिल्हयाचे पोलीस अधीक्षक श्री.संदिप पाटील यांनी आदेश दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, सुभाष राऊत, गुरू गायकवाड यांचे पथक दिनांक दिनांक ६ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ०५.३० वा. चे सुमारास यवत पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पथकास यवत सहकारनगर येथे राजू शेंडगे यांचे घरासमोरील कारमध्ये व घरात मटका जुगार चालू असल्याची बातमी मिळाली होती.
त्याप्रमाणे सदर पथकाने यवत पोलीस स्टेशनचे पो.हवा.शैलेश लोखंडे व संतोष पंडीत यांची मदत घेवून सहकारनगर येथे जावून स्कोडा कार नं. एमएच ४३ एबी ७८२९ व राजू शेंडगे यांचे घरात अचानक छापा टाकून इसम नामे १) दत्तात्रय दशरथ चव्हाण वय ३६ वर्षे रा.कातरखडक ता.मुळशी जि.पुणे २) अतिश अंकुश जाधव वय २२ वर्षे रा.गोणसरी ता.चिपळूण जि.रत्नागिरी ३) संदिप उर्फ धर्मा बबन चव्हाण वय ३५ वर्षे रा.भोर जि.पुणे ४) जितेंद्र पंढरीनाथ चव्हाण वय ३२ वर्षे रा.सहकारनगर यवत ता.दौंड जि.पुणे यांना जागेवर, फोनवर तसेच व्हॉटपअॅप चॅटींगवर मटका आकडे व गुगल पे द्वारे पैसे घेवून कल्याण मटका नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळुन आलेने ताब्यात घेतले.
त्यांचे कब्जातून कल्याण मटका जुगाराची साधने, रोख रक्कम ४५००/- रुपये व स्कॉडा सुपब कार नंबर एमएच ४३ एबी ७८२९ असा एकूण किंमत रुपये ५,३२,६२५/- (पाच लाख बत्तीस हजार सहाशे पंचविस) चा माल जप्त केला आहे. सदर इसम घेतलेला मटक्याचा खेळ हा समीर शेख रा.सातारा याचे मोबाईल फोनचे व्हाट्सअॅपला पाठवून ऑनलाईन मटका पैशांची देवाणघेवाण केल्याचे निष्पन्न झालेने त्याचेवर व मिळून आलेले ४ इसम असे एकूण ५ इसमांविरुध्द यवत पोलीस स्टेशनला मुंबई जुगार कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. ताब्यात घेतलेले ४ आरोपी व जप्त मुद्देमाल यवत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेला असून पुढील अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील हे करीत आहे.