मुंबई : दौंड तालुक्यातील ओढ्यावरील ४ छोट्या पुलांच्या बांधकामासाठी नाबार्ड अंतर्गत सुमारे ५ कोटी ८७ लक्ष रुपयांचा निधी पुरवणी अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आला असल्याची माहिती दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी दिली आहे.
याबाबत अधिक महिती अशी कि, दौंड तालुक्यातील काही ठिकाणी लहान पुलांची दुरवस्था झाली होती हे लक्षात घेऊन या पुलांची नव्याने बांधणी करण्यासाठी राज्याच्या जुलै २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पीय (पावसाळी) अधिवेशनात नाबार्ड २८ अंतर्गत सुमारे 5 कोटी ८७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
नाबार्ड २८ अंतर्गत मंजूर करण्यात आलेला कामांचा तपशील पुढील प्रमाणे – १) कासुर्डी गावाजवळ कॅनॉलवर लहान पुलाचे बांधकाम करणे- १ कोटी ३५ लक्ष २) नांदूर गावाजवळ ओढ्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे- १ कोटी ७० लक्ष ३) दहिटणे गावा लगत सटवाईच्या ओढ्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे- १ कोटी १० लक्ष ४) मळद गावालगत ओढ्यावर लहान पुलाचे बांधकाम करणे- १ कोटी ७२ लक्ष अशा प्रकारे निधी मंजूर करण्यात आला आहे. मंजूर झालेल्या पुलांचे काम सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग पुणे यांचेमार्फत करण्यात येणार असून लवकरच या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला प्रत्यक्ष सुरुवात केली जाईल असे आमदार राहुल कुल यांनी सांगितले आहे.