राज्यात एकाच दिवसात ‛5 लाख’ लोकांचे ‛लसीकरण co-vaccine’, लवकरच इतक्या कोटींचा टप्पा होणार पार! मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन



| सहकारनामा |

मुंबई : देशात आणि राज्यात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने co-vaccine च्या लसीकरनाला  सुरुवात केली आणि त्यास  चांगले यशही येत आहे.



आज लसीकरणात महाराष्ट्राने आतावरची विक्रमी नोंद केली असून आज सायं. ६ वाजेपर्यंत पाच लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आली असून लवकरच आपण दीड कोटींचा टप्पा गाठू अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली असून त्यांनी याबाबत यंत्रणेचे अभिनंदनही केले आहे.

राज्यात कोरोनाचा फैलाव झाल्यानंतर कोरोनावर प्रतिबंध करणारी co-vaccine लस सरकारने उपलब्ध केली मात्र या लसीबाबत अनेक अफवा पसरल्या आणि लोकांमध्ये गैरसमज पसरले होते.

मात्र या सर्वांवर मात करत आज एकाच दिवसात राज्य सरकारने 5 लाख लसीकरण करून लोकांमध्ये लसीकरणाबाबत एक विश्वास जागृत करण्यात यश मिळवले असून लवकरच महाराष्ट्र लसीकरणाचा दीड कोटींचा टप्पा पार करेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.