Categories: Previos News

युट्युबपाहून खतांचे गोडाऊन, घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश : आरोपींमध्ये 5 महाविद्यालयीन तरुण, ३ गुन्हे उघडकीसपुणे ग्रामीण LCB शाखेची मोठी कामगिरी



 पुणे : सहकारनामा ऑनलाईन(अब्बास शेख)

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (LCB) पथकाने पाच आरोपींना ताब्यात घेवून सुमारे आठ लाख रुपयांचे पशू खादय, शेतीची खते व शालेय पोषण आहाराचे गोडावून फोडी आणि वालचंदनगर, इंदापूर व टेंभुर्णी (सोलापूर जिल्हा) या पोलीस स्टेशनला दाखल असलेले तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणल्याची माहीती गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

यातील आरोपी हे महाविदयालयीन युवक असून गोडावूनचे शटर व कुलूप तोडणे याची माहिती त्यांनी युट्युब माध्यमातून घेतल्याचे सांगितले. दिवसा गोडावूनची माहिती काढून पाहणी करून एकमेकांना व्हॉटसअॅप मार्फत गुगल लोकेशन शेअर करून रात्रीचे वेळी एकत्र जमून पाळत ठेऊन ते चोरी करायचे.

 याबाबत अधिक माहिती अशी की दि.३० मार्च २०२० रोजी रात्री मौजे इंदापूर अकलूज रोड ता.इंदापूर जि.पुणे येथील बाजार समिती शेजारील खताचे गोडावूनचे कडीकोयंडा व दरवाजा तोडून खताच्या बॅगा असा किं.रू १,३६,४९०/- चा माल अज्ञात चोरटयांनी चोरून नेलेबाबत गोडावून मालक संजय चंद्रकांत दोशी (रा.इंदापूर) यांनी फिर्याद दिली होती त्यावरून इंदापूर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. इंदापूर तालुक्यात दहा दिवसातच दोन कृषी मालाचे गोडावून फोडीचे गुन्हे घडले होते. कोरोना प्रतिबंध ड्युटीचा ताण पोलीसांवर असूनदेखील व नाकाबंदी रात्रगस्त सक्त करूनही गुन्हे घडले होते. गुन्हा करताना आरोपी कोणताही पुरावा मागे ठेवत नव्हते. त्यामुळे सदर गुन्हे उघडकीस आणणे हे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. सदर कृषी माल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील व बारामती अपर पोलीस अधीक्षक जयंत मिना यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना सुचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकाने गुन्ह्याची माहिती घेवून इंदापूर, टेंभुर्णी, माळशिरस जि.सोलापूर येथे जावून वेशांतर करून गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती काढत  आरोपी १) ऋषीकेश किसन चव्हाण वय २४ वर्षे रा.लवंग, पाटीलवस्ती ता.माळशिरस जि.सोलापूर  २) संदिप जितेंद चव्हाण वय २१ वर्षे रा.तांबवे, चव्हाण वस्ती ता.माळशिरस जि.सोलापूर  ३) योगेश चांगदेव गुटाळ वय २४ वर्षे रा.तांबवे, २५/४ फाटा ता.माळशिरस जि.सोलापूर  ४) उज्वल धनंजय निंबाळकर वय २० वर्षे रा.पंधारवाडी ता.इंदापूर जि.पुणे  ५) विशाल सुरेश थोरात वय २० वर्षे रा.रेडणी ता.इंदापूर जि.पुणे यांना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व सोलापूर जिल्हयातील माळशिरस तालुका येथून सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांचेकडे सदर गुन्हयाचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी दिनांक १९ मार्च २०२० रोजी पिटकेश्वर येथील गोडावूनचे पाठीमागील शटर उचकटून रूपये १,६४,०००/- ची पशुखादयाची पोती चोरल्याचे व त्यानंतर सुमारे १० दिवसांनी इंदापूर मार्केटयार्ड येथील दरवाजाचे कडीकोयंडा तोडून रूपये १,३६,४९०/- च्या खताच्या गोण्या चोरल्याचे तसेच ७ एप्रिल २०२० रोजी टेंभूर्णी एमआयडीसी येथील शालेय पोषण आहार गोडावूनचे शटर उचकटून धान्य, डाळी, तांदूळ , तेल, मसाले व आयशर टेम्पो असा रूपये ५,००,०००/- चा माल चोरी केल्याची कबूली दिली.

याबाबत वालचंदनगर, इंदापूर व टेंभुर्णी (सोलापूर जिल्हा) या पोलीस स्टेशनला एकूण तीन घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. सदर आव्हानात्मक गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, महेश गायकवाड, निलेश कदम, उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, प्रविण मोरे, गुरु गायकवाड, ज्ञानेश्वर क्षिरसागर, काशिनाथ राजापुरे यांनी करून सदर गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींना पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून आरोपींनी आणखीन गुन्हे केल्याची शक्यता नाकारता येत नाही त्याबाबतचा पुढील अधिक तपास इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर हे करीत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

19 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago