यवत जवळ कंटेनरच्या अपघातात 5 जण ठार, अनेकजण गंभीर जखमी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील यवत जवळ  असणाऱ्या सहजपुर फाटा येथे एका भरधाव कंटेनर चालकाने डिव्हायडर तोडून अनेक वाहनांना उडवल्याची घटना घडली असून दुसरा अपघात हा कासुर्डी टोल नाक्याच्या अलीकडे थांबलेल्या एका कंटेनरला वाहन धडकून झाला आहे. या दोन्ही भीषण अपघातामध्ये 5 जण ठार झाले असल्याची माहिती यवत पोलिसांकडून मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एक अपघात हा पुणे-सोलापूर हायवेवर कासुर्डी टोल नाक्याच्या अलीकडे रस्त्यावरच थांबलेल्या एका कंटेनरला पाठीमागून वाहन धडकून झाला तर दुसरा अपघात हा सहजपुर फाट्याजवळ एका कंटेनरने डिव्हायडर तोडून समोरून येणाऱ्या वाहनांना धडक दिल्याने झाला. 

हे दोन्ही अपघात काही अंतरावरच झाल्याने परिसरात मोठी खळबळ माजली होती. या दोन्ही अपघातांमध्ये 5 जण ठार आले असून काहीजण गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. या दोन्ही अपघातांबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.