भंडारा : सहकारनामा
संपूर्ण राज्याला धक्कादेणारी घटना भंडारा जिल्ह्यामध्ये घडल्याने याबाबत प्रशासकीय यंत्रणेनही चौकशीचे आदेश देत मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तर या घटनेबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी वार्तालाप करून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.
या घटनेबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही दु:ख व्यक्त करत लागलेल्या या आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येण्याचे निर्देश देऊन या आगीमध्ये मृत झालेल्या बालकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येईल अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रूग्णालयामध्ये अतिदक्षता नवजात शिशु केअर युनीट (एस एन सी यु) मध्ये अचानक आग लागल्याने 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ही आग शॉर्ट सर्किटने मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास लागली होती.