Categories: Previos News

रक्तदात्या ‛वरवंड’करांचे 5 वे रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न, गावकऱ्यांनी केले आज पर्यंत 476 बॉटल रक्तदान



– सहकारनामा

दौंड : दौंड तालुक्यातील वरवंड या गावाने एक नवा आदर्श संपूर्ण तालुक्यासमोर घालून दिला आहे.या गावांतील सर्व पक्ष आणि जातीधर्माच्या युवकांनी एकत्र येत तब्बल 5 वेळा रक्तदान शिबिर घेऊन ते सक्सेस करून दाखवले आहे.

आज मंगळवार दि. 6 एप्रिल 2021 रोजी वरवंड येथे 5 वे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळेस सहयाद्री हॉस्पिटलच्या मदतीने 73 बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. खरं तर यावेळी कोरोनाचे संकट, तसेच लस घेतलेल्या लोकांना रक्तदान करता येत नव्हते. मात्र तरीही तरुण मित्र, सहकार्‍यांनी भरभरून असा प्रतिसाद दिला. 

रक्तपेढीने सुद्धा आश्चर्य व्यक्त केले व भविष्यात वरवंडकरांना रक्ताची गरज लागल्यास मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सर्व रक्तदात्यांचे तसेच सर्व आयोजकांचे, गोपीनाथ शाळा, कर्मचारी सर्व स्टाफ रक्तदान शिबिरास मदत करणाऱ्या सर्वांचेच आभार मानण्यात आले.

आजपर्यंत कोरोनाच्या काळामध्ये वरवंडकरांनी केलेले रक्तदान व त्याचा तपशील पुढील प्रमाणे…

१) दिनांक 2 एप्रिल 2020 ससून रक्तपेढी 112 बॉटल संकलन

२) दिनांक 2  जून2020 अक्षय ब्लड बँक 128 बॉटल संकलन

३) दिनांक एक 26 ऑगस्ट 2020 दौंड रोटरी क्लब 61 बॉटल

4) दिनांक 2 फेब्रुवारी 2021  संजीवनी ब्लड बँक 102 बॉटल 

5) 6 एप्रिल 2021 सह्याद्री हॉस्पिटल- 73 बॉटल. असे आतापर्यंत आपण रक्त संकलित करण्यात आले आहे.

यावेळी सरपंच मीनाताई रामदास नाना दिवेकर., उपसरपंच प्रदीप भाऊ दिवेकर, मा.जिल्हा परिषद सदस्य संजय आण्णा दिवेकर , विदाजी दिवेकर, संदीप दिवेकर, फासगे सर, अनिल सर, भालचंद्र शितोळे बाप्पू बारवकर, संग्राम दिवेकर, दत्तात्रय दिवेकर, नाना शेळके संतोष कचरे, राजेंद्र शेलार यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

24 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago