Categories: Previos News

वाळू वाहतूक करणाऱ्या 5 वाहनांवर कारवाई, 27 लाखाचा मुद्देमाल जप्त



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी) 

पुणे-सोलापूर महामार्गावर अवैध वाळू वाहतूक होत असल्याने लोणी काळभोर पोलिसांकडून या वाहनांवर कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी उरुळी कांचन दूरक्षेत्रातील परिसरात आपल्या सहकार्याच्या मदतीने पाच वाहनांवर कारवाई करत एकुण 27 लाख 14 हजाराचा माल जप्त केला. 

पोलिस नाईक एस एस चितारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पुणे सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ व उरुळी कांचन परिसरात काही वाहनातून अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस कार्यालयाला समजली होती. या नंतर लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांना यावर त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यांनी उरुळी कांचन पोलिस मदत केंद्राचे पोलिस कर्मचारी पोलिस हवालदार एम जे गायकवाड,  पोलिस नाईक एस.एस चितारे, एस व्हि पवार पोलिस शिपाई भोसले यांना सोबत घेऊन कोरेगाव मूळ गावच्या शिवारात इनामदार वस्तीजवळ एक टाटा कंपनीचा ट्रक तसेच उरुळी कांचन येथे अन्य वाळूचे चार ट्रक व त्यावरील चालकांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याच्याकडे वाळू उत्खनन व वाहतूक संदर्भात कोणतीही परवानगी नसल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले तर एक चालक पळून गेला. या पाच वाहनात मिळून 19 ब्रास वाळू हस्तगत करण्यात आली.  वाहतूक करणारी एकूण पाच वाहने, वाळू असा एकुण 27 लाख 14 हजाराचा माल जप्त करण्यात आला. पूर्व हवेलीतील गावामध्ये अशाप्रकारे मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा चालू आहे परंतु महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. मुळा मुठा नदीच्या काठावर नदीपात्रातील वाळू काढून अनेक वाहने रात्रीच्या वेळी बाहेर पडतात. याकडेही संबंधित अधिकार्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

21 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago