प्रत्येक तमाशा कलाकारास 5 हजार तर फड मालकांना 25 लाख द्या : आमदार राहुल कुल यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी



– सहकारनामा

पुणे : राज्यात सद्यस्थितीत कोव्हीड १९ ने पुन्हा थैमान घातले असून, सर्व ठिकाणच्या यात्रा जत्रा व इतर सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याची लोककला असलेल्या तमाशा फड मालकांवर देखील या महामारीचा मोठा परिणाम झाला आहे. याबाबत या 

ड कलावंतांना 5 हजार तर छोट्या फड मालकांना 10 लाख आणि मोठ्या फडमालकांना 25 लाख रुपये अनुदान देण्याची मागणी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी केली आहे.

राज्यात सुमारे १४० हून अधिक नोंदणीकृत तमाशा फड असून त्यापैकी १२ मोठे फड हे सुमारे २०० हून अधिक कलाकार असलेले आहेत तर ११८ फड हे प्रत्येकी ५० ते ६० कलाकार असलेले आहेत. राज्यभरात एकूण ६००० हून अधिक तमाशा कलावंत असून कोव्हीड १९ – कोरोना महामारीने या महाराष्ट्राची लोककला जपणाऱ्या कलाकारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

त्यामुळे जो पर्यंत यात्रा जत्रा सुरु होत नाहीत तो पर्यंत या प्रत्येक कलाकाराला सुमारे ५ हजार रुपये मानधन मदत म्हणून देण्यात यावे व हंगाम सुरु झाल्यानंतर मोठ्या फड मालकांना २५ लाख व छोट्या फड मालकांना १० लाख रुपये अनुदान पुन्हा नव्याने फड सुरु करण्यासाठी द्यावेत अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. उद्धवजी ठाकरे, विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री पुणे मा. ना. अजितदादा पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री मा.अमितजी देशमुख व  जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे आमदार राहुल कुल यांनी पत्राद्वारे केली आहे.