खुशखबर.. आता पुण्यात खाजगी वाहने, बसेस ‛5’ दिवस सुरू राहणार!



– सहकारनामा

पुणे : पुण्यात मिनी लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर एक एक करून नविन नियमावली जाहीर होऊ लागली अण नागरिकांमध्ये या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होऊ लागला.

हे निर्णय व्यापारी आणि नागरिकांच्या पचनी पडत नसल्याने त्यास विरोधही सुरू झाला. असाच विरोध पुण्यातील बससेवा बंद ठेवण्याच्या विरोधात सुरू झाला. यात भाजपनेही आंदोलन केले मात्र आता पुणे महानगर पालिकेने नवीन नियम जाहीर करत पुणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारची खाजगी वाहने, खाजगी बसेस

सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते

सायंकाळी 6 वाजेपर्यंत  सुरू राहणार असल्याचे नमूद केले आहे. 

मात्र हि सेवा शुक्रवारी सायं. 6 ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत (अत्यावश्यक सेवा वगळून) पूर्णपणे बंद राहणार आहे.

पुणे मनपा क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांचे साईटसाईट, आर्किटेक्चर ऑफिस सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत सुरू

राहणार आहे.

पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित

उत्पादने, शासकीय व खाजगी सुरक्षा सेवा, फळ विक्रेते, मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने, पुश वैद्यकीय दवाखाने, पाळणी प्राणी संगोपन केंद्र, पाळीव प्राणी खाद्याची दुकाने खासगी कार्यालये आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहणार आहेत.