दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील चिंचोली येथे सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये काल 53 जणांची तपासणी करण्यात आली होती. या 53 पैकी 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रासगे यांनी दिली आहे.
या 13 कोरोना बाधित रुग्णांमध्ये एका 5 वर्षीय बालकाचाही समावेश असल्याची माहिती मिळत असून हे 13 रुग्ण 5 वर्षे ते 67 वर्षे वयाचे असल्याची माहिती देण्यात आली आहे.
तपासणी करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये पाटस 6, गिरीम 1, कुरकुंभ 4, खडकी 1 आणि देऊळगाव राजे 1 असे एकूण 13 जणांचा समावेश आहे. या 13 रुग्णांमध्ये 5 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे.