Categories: Previos News

भांडगावच्या पेट्रोल पंपावरील 4 लाख रुपये घेऊन फरार झालेल्या आरोपीस यवत पोलिसांनी केले जेरबंद

दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील भांडगाव येथे असणाऱ्या  यशोदा पेट्रोलपंपावरील सुमारे ०४ लाख रुपये कॅश घेऊन फरार झालेल्या  आरोपीस यवत पोलिसांनी जेरबंद केले आहे.

दिलीप नाईकनवरे या आरोपीने भांडगाव गावच्या हददीत असणाऱ्या यशोदा पेट्रोलियम येथून दि. ११/१२/२०२० रोजी ते १२/१२/२०२० रोजी दरम्यान दोन दिवस डिझेल विक्रीतून मिळालेली सुमारे  ४,०२,२७०रू /- (चार लाख दोन हजार दोनशे सतर रूपये) ही रोख रक्कम घेऊन पसार झाला होता. 

याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविल्यानंतर  यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश पोटे, पोलीस नाईक भोसले, पोकॉ कुंजीर यांनी आरोपीस यवत येथील आनंदग्राम सोसायटीच्या टेरेसवरून ताब्यात घेतले होते. 

आरोपीला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून आरोपीने चोरलेली रक्कम कुठे ठेवली किंवा खर्च केली याबाबत माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात येण्याची शक्यता आहे.

या घटनेचा अधिक तपास या गुन्ह्याचे तपासी अंमलदार भोसले हे करीत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

16 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

18 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

20 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago