Categories: Previos News

दौंड तालुक्यामध्ये 49 ग्रामपंचायतीचे धक्कादायक निकाल, अनेक प्रतिष्ठीतांना धक्का

दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीचे निकाल बाहेर येत असून येथील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उमेदवारांना धक्के बसले आहेत.

दौंड तालुक्यामध्ये कुल-थोरात हे दोन प्रबळ गट आहेत. मात्र या निवडणुकीला कुल-थोरात ऐवजी गावपातळीवरील जशी गणिते जुळतील तसे उमेदवार उभे राहिले होते. त्यामुळे या निवडणुकीत अनेक कुल-थोरात गटाच्या कार्यकर्त्यांनी आपले गट-तट विसरून एकत्र पॅनल करत ही निवडणूक लढवली आहे. जवळपास सर्वच ग्रामपंचायतींचे पॅनेल हे तालुक्यातील वरिष्ठ नेते मंडळींचे फोटो न लावता आपापले गावपातळीवरील उमेदवार आणि गावपातळीवरील पॅनल प्रमुखांच्या बॅनरखाली निवडणूक लढवताना पाहायला मिळाले.

या निवडणुकीत तालुका पातळीवरील अनेक दिग्गज उभे राहिले होते. परंतु यातील अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.

निवडणुकीची मतमोजणी आणि निकाल अजूनही येत असून यात गावपातळीवरील अनेक नव्या चेहऱ्यांना नागरिकांनी संधी देत प्रतिष्ठित उमेदवारांना पराभवाचा धक्का दिला आहे. थोड्याच वेळात गावे व त्यातील विजयी उमेदवार आणि त्याची आकडेवारी देत आहोत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

13 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago