दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यातील यवत ग्रामिण रुग्णालयाच्या विभागात येणाऱ्या केडगाव, यवत, चौफुला हि 3 गावे सध्या हिटलिस्टवर असल्याचे अहवालातून पुढे येत आहे.
यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दि.28 मार्च रोजी 49 जणांचे घशातील नमुने हे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या 49 पैकी 23 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर 26 जण निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये एका 3 वर्षाच्या बाळाचाही समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या गावांमध्ये केडगाव 6, यवत 4, चौफुला 5, वरवंड 2, पडवी 2, खुटबाव 1, देऊळगाव गाडा 1, उरुळी कांचन 1, माळशिरस 1 असे एकूण 23 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 16 पुरुष आणि 7 महिलांचा समावेश असून त्यांचे वयोमान 3 वर्षे ते 72 वर्षांदरम्यान आहे.