|सहकारनामा|
पुणे : मागील २ दिवसाच्या कालावधीत हडपसर पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या प्रकारच्या मालमत्ता व जबरी चोरीचे गुन्हे दाखल झाल्याने हे गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याच्या उद्दीष्ठाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सौरभ
माने व अंमलदार यांनी प्लॅन ऑफ अॅक्शन तयार करत दिनांक ०२/०८/२०२१ रोजी ससाणेनगर येथे अचानक तपासपथकाची नाकाबंदी राबवून वाहन तपासणी करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी एक टेंम्पो ज्या मधून सेंट्रीग प्लेटा आणि त्याची वाहतूक करणारे ३ संशयीत पोलिसांनी ताब्यात घेवून त्याची पाहणी केली असता, त्यामध्ये ७० सेंट्रीग प्लेटा मिळून आल्या. त्याबाबत त्यांचेकडे तपास करता आरोपी १) साहील अर्जुन कचरावत (वय २१, रा. स.नं ६८, सातवनगर हांडेवाडी रोड, गणपती मंदिराजवळ हडपसर पुणे) २) अक्षय बाळू शिंदे (वय २१, रा.पावरहाऊस, सासवड रोड, गणपती मंदिराजवळ, हडपसर पुणे) ३) एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक तपास केला असता त्यांनी हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ५९२/२०२१ भादंविक ३७९ व ५९३/२०२१ भादंविक ३७९ हे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले. वरील आरोपींना गुन्ह्यात अटक करून त्यांच्याकडून ८० हजार रुपयांच्या ७० प्लेटा जप्त करण्यात आल्या.
तर दुसऱ्या गुन्ह्यात दिनांक ०१/०८/२०२१ रोजी सायंकळच्या वेळेस फिर्यादी हे जेवणाचे पार्सल आणण्याकरीता सार्थक हॉटेल, सातववाडी रोड, हडपसर पुणे या ठिकाणावरून जात असताना त्यांना ३ अज्ञात आरोपींनी गाडीवरून येऊन त्यांची गचंडी पकडत, कानाखाली मारून त्यांचे गळ्यातील सोन्याची चैन व हातातील दोन अंगठ्या असा किंमती ऐवज जबरदस्तीने चोरून नेला होता.
वरिल गुन्ह्याची माहीती मिळताच तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी जावून फिर्यादी यांची भेट घेवून गुन्ह्याची माहीती घेवून संशयीत आरोपींचे वर्णन बाबत माहीती गोळा करून तपासास सुरवात केली. त्यावेळी मिळालेली माहीती व संशयीतांच्या वर्णना आधारे संशयीत आरोपी
१) दशरथ शिवाजी शेलार (वय २२, रा. महात्मा फुले वसाहत, गंगानगर
हडपसर पुणे)
२) तेजस दत्तात्रय खंडागळे (वय २०, रा. महात्मा फुले वसाहत, गंगानगर हडपसर पुणे)
३) एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास करून आरोपींकडून त्यांनी जबरदस्तीने
चोरून नेलेली १ तोळे वजनाची सोन्याची चैन व गुन्हा करताना वापरलेली मोपेड असा १,२०,०००/चा माल हस्तगत करून हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं ५९४/२०२१ भादंविक ३९२,३४ हा गुन्हा उघडकीस आणला आहे.
तिसऱ्या प्रकारात डी.पी.रोड माळवाडी हडपसर पुणे येथे तपास पथकाची पुन्हा एकदा दिनांक ०३/०८/२०२१ रोजी अचानक वाहन तपासणी मोहीम राबवून त्यामध्ये संशयीत वाहन तपासणी करीत असताना, संशयीत आरोपी
१) पंकज सुरेश शिंदे (वय ३३, रा. आनंद कॉलनी, द्वारका बाग, धनलक्ष्मी स्विट होम शेजारी, मुंढवा पुणे)
२) सच्छिदानंद शंकर कुसाळकर (वय २५, रा. यशवंतनगर चंदननगर पुणे) यांना त्यांचे ताव्यात गिळून आले पांढऱ्या रंगाची ज्युपीटर अॅक्टीया नं.एम.एच.१२.एस.झेड ५६९४ याबाबत विचारपुस करता त्यांनी असमाधानकारक माहीती दिल्याने त्यांना पोलीस स्टेशन येथे घेवून त्यांचेकडे तपास करीत असताना, त्यांनी सदरची मोटार सायकल ही नोबेल हॉस्पीटलचे पार्कीग मधून सुमारे १५ दिवसापुर्वी चोरली असल्याचे निष्पन्न झाले. त्याबाबत हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ५४१/२०२१ भादंवि ३७९ प्रमाणे दाखल असल्याची माहीती उपलब्ध झाली.
नमुद आरोपी यांना दाखल गुन्ह्यात अटक करून त्यांचेकडे अधिक कसोशीने तपास करता, त्यांनी यापुर्वी घरफोडी, चैनचोरीचे, वाहनचोरीचे, गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्यांचेकडून आज रोजी पर्यंत
१) चंदननगर पोलीस स्टेशन गु.र.नं २०७/२०२१ भादंविक ३९२.३४ या गुन्ह्यातील जबरदस्तीने चोरून
नेलेले सोन्याचे गंठण वजन १२.५० ग्रॅमचे हस्तगत करण्यात आले आहे
२) मुंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं १५४/२०२१ भादंविक ३७९.३४ मधिल चोरून नेलेली ज्युपीटर मोपेड क्रमांक एम.एच.१२ पीएक्स ६७३८ ही हरतगत करण्यात आली आहे.
३) हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं ४२६/२०२१ भादंविक ४५४,३८० या गुन्ह्यातीले चोरीस गेले दागिने वजन ४४ ग्रॅम वजनाचे हस्तगत करण्यात आले असून सर्व गुन्ह्यातील हे गुन्हे उघडकीस आले असून किं.रू २,३०,०००/- चा माल हस्तगत केला आहे.
अशा पध्दतीने मागिल ४८ तासाच्या कालावधित हडपसर पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अथक प्रयत्नातुन २ जबरी चोरीचे गुन्हे, २ सेंट्रीग प्लेटा चोरीचे गुन्हे, २ वाहनचोरीचे गुन्हे, १ घर फोडीचा गुन्हा असे ७ गुन्हे उघडकीस आणून किं.रू ५ लाख ३० हजार चा माल हस्तगत करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
सदरची कामगिरी ही मा.नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व मा. नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे सुचना व मागदर्शनाखाली मा. कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, श्री. बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. राजु अडागळे, पोनि.(गुन्हे) श्री.दिगबर शिंदे पोनि (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक सौरभ माने, पोलीस हवालदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड, गणेश क्षिरसागर, पोलीस नाईक अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, पोलीस शिपाई शाहीद शेख, शशिकांत नाळे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.