दौंड उपजिल्हा रुग्णालयाच्या अहवालात आज 46 जण तर यवत कोविड सेन्टरमधील अहवालात 31 जण कोरोनाची पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा

दौंड उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज 138 जणांची कोरोना रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये 46 जण पॉझिटिव्ह आले असून 92 लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

याबाबतची अधिक माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.

तर यवत कोविड सेंटरमध्ये 17 मार्च रोजी घेण्यात आलेल्या 161 जणांच्या Swab टेस्टमध्ये  31 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे अशी माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.

दौंड शहर आणि दौंड शहराच्या बाजूला असणाऱ्या ग्रामिण भागातील 138 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली त्यामध्ये शहरातील 25 तर ग्रामीण भागातील 21 असा 46 जनांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 46 जणांच्या आलेल्या रिपोर्टमध्ये पुरुषांची संख्या 24 असून महिलांची संख्या 22 इतकी आहे. 

सध्या कोरोनामुळे दौंड शहरात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र दिवसभर सर्व व्यवहार सुरळीत सुरू असून नागरिकांनी गर्दी टाळली नाही तर दिवसाही काही निर्बंध लावले जाऊ शकतात यात शंका नाही. तशीच काहीशी परिस्थिती दौंड तालुक्यातील ग्रामिण भागमध्येही पाहायला मिळत असून सध्या तालुक्यातील मोठी गावे यवत, केडगाव, पाटस हि कोरोनाच्या हिटलिस्टवर असलेली पहायला मिळत आहे.