दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही नागरिक बेफिकीरपणे वागत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. या सर्व बाबी लक्षात घेता आता पोलीस प्रशासनही अशा लोकांवर धडक कारवाई करत असून मास्क न लावणाऱ्या या लोकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करत दंड वसूल केला जात आहे.
आज दि.28 जून रोजी दौंड तालुक्यातील पाटसमध्ये मास्क न घातलेल्या २६ आणि यवत गावातील 17 व्यक्तींवर ग्रामपंचायत व पोलीसांनी संयुक्त कारवाई केलेली आहे व या लोकांकडून सुमारे 13 हजार 700 रुपये अनुक्रमे इतका दंड ग्रामपंचायतीने वसुल केला असल्याची माहिती यवतचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांनी दिली आहे.