Categories: पुणे

भीमा पाटस कारखान्याची ‘सत्य’ परिस्थिती आली समोर | आरोप करणारे निरुत्तर.. आ.‘राहुल कुल’ यांच्या ‘त्या’ कृतीची सर्वत्र चर्चा

दौंड : भीमा सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा वादळी होणार, विरोधकांना बोलू दिले जाणार नाही, गोंधळ घातला जाणार अश्या अनेक अफ़वा गेल्या दोन तीन दिवसांपासून उठत होत्या. विद्यमान आमदार राहुल कुल हे निरुत्तर होणार, त्यांना कारखान्याच्या त्या किचकट प्रश्नावरून घेरले जाणार इथपर्यंत चर्चा सुरु होती. मात्र भीमा पाटस कारखान्याची सर्वसाधारण सभा सुरु झाली अण सगळं चित्रच पालटलं.

आज शनिवार दि.२८ सप्टेंबर रोजी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आ.राहुल कुल हे मोठ्या टेंशनमध्ये असणार असे सर्वांना वाटतं होते मात्र ज्यावेळी राहुल कुल स्टेजवर आले त्यावेळी त्यांचा ‘कुल आणि प्रसन्न’ चेहरा पाहून अनेकांना हा अनपेक्षित धक्का बसला.
भीमा पाटस कारखाना सहकारी आहे की खाजगी झाला आहे याबाबत संचालक मंडळ आणि प्रामुख्याने कारखान्याचे चेअरमन राहूल कुल यांच्यावर विरोधकांकडून अनेक हे आरोप केले जायचे मात्र आज सर्व राजकीय विरोधक, कारखाण्याचे सभासद आणि शेतकऱ्यांना आ. राहुल कुल यांनी अत्यंत नम्र स्वभाव आणि शांतपणे उत्तरं दिल्याने विरोधकही चक्रावून गेले.

भीमा पाटस कारखान्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी १:०० वाजता सुरु झाली. सभेची सुरुवात भीमा पाटस चे संचालक विकास शेलार यांनी सूत्रसंचालनाने केली. यावेळी शहीद झालेले भारतीय जवान, निधन झालेले तालुक्यातील जेष्ठ नागरिक, कारखाण्याचे सभासद निवृत्त कर्मचाऱ्यांना सर्वांनी उभे राहून श्रद्धांजली वाहिली. भीमा पाटस कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेव बारवकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कारखान्याचे चेअरमन आ.राहुल कुल यांनी प्रस्ताविक करताना, उपस्थितांचे स्वागत करून सन २०२३-२४ चा आर्थिक अहवाल व ताळेबंद नफा, तोटा पत्रक संचालक मंडळाच्या वतीने सादर केले.

यावेळी त्यांनी बोलताना कारखाण्याच्या अडचणीमुळे एमएससी बँक, पिडीसीसी बँक यांनी जी प्रक्रिया सुरु केली ती योग्य दिशेने जाऊन कारखाना, सभासद, शेतकरी यांचे हित जपण्याच्या दृष्टिने निर्णय घेण्यात आला आणि त्या निर्णयामुळे आज आपला सहकारी कारखाना सहकारी राहिला असून तो आज चांगल्या परिस्थितीमध्ये सुरु असल्याचे सांगितले. बँकानी काही निर्णय घेतले, बँकांच्या निर्णयाला आपण काही निर्णय घेतले त्यास आपण संमती दिली. निराणी ग्रुपचे अभिनंदन करत त्यांनी सहकार्य केले असे म्हटले.
६,३६,९३३ टनाचं गाळप होऊन ७,४,२७० क्विंटल साखर पोत्याचं उत्पादन झाल्याचं त्यांनी सांगत कारखाना सुस्थितिमध्ये सुरु असल्याचा आनंद होत असल्याचे म्हटले.

यावेळी कारखाण्याच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाचा प्रश्न येत्या १५ दिवसांत मार्गी लावला जाईल असे चेअरमन राहुल कुल यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
यावेळी कुल यांनी उपस्थितांना संबोधित करताना, सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आज सर्वांनी नियम पाळून प्रश्न केले तर त्याची उत्तरे योग्यपद्धतीने दिली जातील. ही संस्था कायद्याच्या चौकटीत ठेऊन ही संस्था जपण्याचा प्रयत्न केला आहे. सर्व सभासदांनी विश्वास दाखवला त्यांचे मी आभार मानतो. कुणी गोंधळ न करता सभेचं कामकाज चालू द्यावे कितीवेळ झाला तरी आपण सर्व प्रश्नांना उत्तरं देऊ. प्रत्येकाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे आणि त्यासाठी मी सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देईल असे सांगून विषय पत्रिकेचे वाचन सुरु झाले.

यावेळी जिल्हा बँकेचे मा.अध्यक्ष, मा.आमदार रमेश थोरात, नामदेव ताकवणे, राजाराम तांबे, वैशाली नागवडे या मुख्य फळीतील नेत्यांनी अनेक प्रश्न विचारून चेअरमन आ.राहुल कुल यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्येक प्रश्नांची मुद्देसूद आणि शांततेमध्ये कुल यांनी उत्तरे दिल्याने अनेकजण निरुत्तर झाले. एका एकाने प्रश्न विचारा आणि एक एक प्रश्न विचारा, प्रत्येकाचे उत्तर दिले जाईल आणि प्रत्येकाला संधी दिली जाईल असे कुल यांनी अगोदरच जाहीर केले होते. मात्र तरीही काहीजण मध्येच माईक घेऊन गडबड गोंधळ करत असल्याने नाईलाजास्तव त्यांचे माईक बंद करून समोरील व्यक्तीच्या प्रश्नाचे उत्तर देऊन समाधान करण्यात येत होते. काहींना याचा राग येऊन त्यांनी माईक सुद्धा फेकले.

यावेळी दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यांनी मधुकाका शितोळे यांचा अहवालावर फोटो छापल्याबद्दल तसेच निवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन देणार असल्याबद्दल चेअरमन आ.राहुल कुल व संचालक मंडळाचे अभिनंदन केले. आणि कारखाना २५ वर्षे भाडे तत्वावर दिला आहे का याची माहिती लोकांना द्यावी असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी चेअरमन आ.राहुल कुल यांनी उत्तर देताना, कर्ज थकलं म्हणून पिडीसीसी बँकेने सरफेसीची नोटीस २१.७.२०२१ ला कारखाण्याला दिली आणि १७.८.२०२१ ला पुणे जिल्हा बँकेने सर्व पंचनामा करून विधिवतरित्या कारखाण्याचा ताबा घेतला. त्यात बँकेने गैर केलं असं मी म्हणत नाही. कर्ज थकलं म्हणून ती त्यांची वसुली कारवाई होती. परंतु त्यानंतरच्या कालावधीमध्ये एमएसी बँक आणि जिल्हा बँक मिळून त्यांच्या काही बैठका झाल्या, तुम्ही बँकेचे संचालक म्हणून तुम्ही मी पण काही बैठका केलेल्या आहेत. त्यामधून पुणे जिल्हा बँकेच्या पण काही अटी आहेत याची चर्चा करून त्यानंतर एमएससी बँकेने जे टेंडर काढलं ते सर्वांना ओपन होतं. टेंडर कुणीही भरू शकत होतं. पण कारखाना विकला जान योग्य नव्हतं परंतु जप्त केल्यानंतर राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे आपलाच नव्हे तर इतर कारखाने सुद्धा चालवण्यासंदर्भात एक धोरण राज्य शासनाने हाती घेतलं. सहकारी कारखाने विक्री न करता ते चालवले जावे हा त्या मागचा उद्देश होता. त्या प्रमाणे आपलाही कारखाना भाडे तत्वावर देण्या संदर्भातली टेंडरची रीतसर प्रक्रिया एमएससी बँक, पिडीसीसी बँक यांनी केली.

त्यामध्ये आमचा अधिकार जरी नसला तरी कारखाण्याचा एक भाग म्हणून, संचालक म्हणून आम्हालाही विचारणा होत होती. ओपन टेंडर निघालं, ते तीनवेळा भरलं गेलं नाही आणि नंतर आम्ही सर्वांनी प्रयत्न करून हा कारखाना सुरु झाला पाहिजे या विचाराने सगळयांच्या संमतीने या टेंडरमध्ये निराणी शुगरची बीड आली ती बीड कायद्यात होती त्याप्रमाणे त्यांना ते चालवीण्याचे अधिकार दिले असे कुल यांनी उत्तर देताना सांगितले. तसेच ओपन टेंडरमध्ये कोणीही भाग घेऊ शकत होतं पण यामध्ये पिडीसीसी बँकेचे सर्वच्या सर्व पैसे भरण्याची अट होती ती कोणी भरले नाही. वास्तविक पाहता कोणताही या स्थितीत असणारा कारखाना १०० कोटीच्या आसपास सहज विकत मिळतो असे असताना तो फक्त चालविण्यासाठी दीडशे कोटी कोण भरणार हा व्यवहारिक प्रश्नचिन्ह असल्यामुळे कोणी ते भरले नाही आणि त्यामुळे निराणी ग्रुपने ते भरले आणि त्यामुळे एमएससी बँकेने आणि पिडीसीसी बँकेने त्यास मान्यता दिली.

एमएससी बँकेने त्यांचे भाडे मिळणार आणि त्यांची वसुली होणार आणि पिडीसीसी बँकेने आमचे सगळेचे सगळे पैसे आम्हाला वन स्ट्रोक (OTS) आम्हाला पाहिजेत या अटीवर या दोघांच्या संमतीनं हे टेंडर दिलं गेलं त्याची एक प्रत मुळात एमएससी बँकेत पण आहे आणि पिडीसीसी बँकेत पण आहे. पिडीसीसी बँकेचा प्रतिनिधी आल्यानंतरच तो निर्णय झालाय. त्याच्यामध्ये जे काही त्या त्या संस्थांचे प्रमुख होते त्या सगळ्यांचा सहभाग आहे. त्यामध्ये ते कायदेशीर कसं होईल याची काळजी आम्ही सर्वांनी घेतलेली आहे. यामुळे सभासदांना याचा फायदा झाला, योग्य ऊस दर दर मिळाला आणि कारखान्याच्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा यामुळे फायदा झाला.

यावेळी कारखान्याचे चेअरमन आमदार राहुल यांना नामदेव ताकवणे, राजाराम तांबे, वैशाली नागवडे यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून घेरण्याचा प्रयत्न केला मात्र तो विफल राहिला. आज सर्व सभासद आणि उपस्थित शेतकरी, विरोधकांनी राहुल कुल यांचा सय्यम, अभ्यास, तत्परता पाहिली. त्यांना एक ना अनेक प्रश्न विचारूनही त्यांनी प्रत्येकाला बोलण्याची संधी देऊन त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. वेळ प्रसंगी आपल्या कार्यकर्त्यांना शांत बसवून आज विरोधकांना पुरेपूर वेळ देऊन त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला मात्र कुल यांनी आपल्या कुल स्वभावाने आज हे सफल होऊ दिले नाही. अखेर राष्ट्रागीताने सभेची सांगता करण्यात येऊन खेळीमेळीच्या वातावरणात आजची सभा संपन्न झाली.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

दौंड मध्ये पहिल्यांदाच कर्णबधिर विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

15 तास ago

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे – बाळासाहेब लाटकर

‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे - बाळासाहेब…

1 दिवस ago

दौंड च्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

दौंडच्या पोलीस निरीक्षक पदी गोपाळ पवार यांची नियुक्ती

2 दिवस ago

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तरं देऊ – आमदार राहुल कुल

निवडणुकी पुरते बाहेर पडणाऱ्या सिजनेबल पुढाऱ्यांकडे दुर्लक्ष करा | कुणाला काही टिका करू द्या, आपण…

2 दिवस ago

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा उद्या पिंपळगाव येथे मेळावा

3 दिवस ago