बारामतीमध्ये जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड, 13 जुगाऱ्यांवर गुन्हा दाखल

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अवैध धंदे आणि अवैध व्यावसायिकांची गय केली जाणार नाही असे जाहीर केल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. मात्र तरीही अवैध धंदेवाले आपले बस्तान कुठे न कुठे बसवताना दिसतच आहे.
असेच एक बस्तान बारामती शहरामध्ये बसवलेल्या टोळक्याला पोलिसांनी रंगेहात पकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
बारामती येथील प्रबुद्धनगर आमराई येथे असणाऱ्या एका किराणा दुकानाच्या पाठीमागील खोलीमध्ये आरोपी संदेश शत्रुघ्न मागाडे (वय ३७ वर्षे रा. प्रबुद्धनगर आमराई बारामती ता. बारामती जि.पुणे) हा आरोपी केतन रत्नदीप सोनवणे, आरिफ युनूस बागवान, संदीप महादेव रणपिसे धीरज राजवंत अहिवळे तसेच अन्य 9 आरोपी (नाव माहीत नाही, सर्व रा.बारामती) असे एकूण 13 आरोपी हे आपल्या स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा तीन पत्ते नावाचा जुगार पैशावर खेळत आणि खेळवीत असताना मिळून आले. यावेळी त्यांच्याकडून रोख 6189 रुपये व आठ मोबाईल हॅन्डसेट, एक लाकडी टेबल, सहा प्लॅस्टिकच्या खुर्ष्या, 7 पत्त्यांचे कॅट किमतीचे असे
एकूण 45250/- रुपयांच्या मुद्देमालासह मिळून आले.
आहेत. याबाबत विरुध्द आरोपींविरुद्ध सरकारतर्फे वैभव भगवान साळवे ( पोलीस हवालदार, उपविभागीय अधिकारी, बारामती कार्यालय) यांनी फिर्याद दिली असून अधिक तपास सपोनि दंडीले हे करीत आहेत.