दौंड तालुका शिवसेनेच्या वतीने “बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना” अंतर्गत सर्वरोग निदान व आरोग्य शिबीर संपन्न, 421 रुग्णांचा सहभाग



दौंड : सहकारनामा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब  ठाकरे  यांचे जयंती निमित्त दौंड तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, चौफुला येथे मोफत सर्वरोग निदान व आरोग्य शिबीर घेण्यात आले. 

यावेळी रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी, कॅल्शियम तपासणी, मोफत इ.सी.जी.तपासणी, हाडांची तपासणी,मोतिबिंदू ,काचबिंदू लासुर तपासणी,सांधेवात तपासणी, हृदय होल शस्त्रक्रिया , अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी  इ.आजारांचे तज्ज्ञ  डॉ. सुरेश दराडे, डॉ. विशाल मेहता, डॉ. राहुल काळभोर, डॉ. राजेश्वर नांदेड, डॉ. सुनील ढाके, डॉ. जे.डी.थोरात डॉ. अनिल पायमोडे, डॉ. गिरीश पाटील, डॉ. महेंद्र दुशिंग, डॉ. वंदना मोहिते, डॉ. श्रद्धा काळे डॉक्टरांद्वारे मोफत तपासणी केली व या आरोग्य शिबिरात रोगनिदान झालेल्या रुग्णांवर सवलतीत उपचार केले जाणार आहेत.

शिबिरात एकूण ३११ जनरल मेडिसिन रूग्ण तपासणी, ११० डोळे तपासणी , करण्यात आली पैकी ३१ रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केली जाणार असून, तसेच तपासणीनंतर  ४० जणांना चष्मे वाटप करण्यात आले व ५० रुग्णांची ईसीजीसह आवश्यक हृदयरोग तपासणी करण्यात आली पैकी ५ रुग्णांवर  हृदयरोग शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच हृदय होल ,पायाची शस्त्रक्रिया इतर अनेक प्रकारचे ऑपरेशन्स शासकीय योजनेंच्या माध्यामातून केले जाणार आहेत.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर यांनी सांगितले की केंद्र शासनाच्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान तसेच राज्य शासनाच्या विविध योजनें अंतर्गत तालुक्यात प्रथमच ‘आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ ही योजना ग्रामीण भागात शिवसेना दौंड यांचे वतीने प्रथमच राबविण्यात आली. यापुढेही शिवसेना दौंड यांचे माध्यमातून प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या गुरूवारी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, चौफुला या ठिकाणी “बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना”  अंतर्गत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी व त्यावरील पुढील उपचारही मोफत केले जाणार आहेत. 

यावेळी शिवसेना दौंड-इंदापूर विधानसभा संपर्क प्रमुख संजीवजी शिरोडकर, उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर, दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या महिला जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार,जिल्हा परिषद सदस्य विरधवल बाबा जगदाळे, पंचायत समिती उपसभापती नितीन दोरगे, रामभाऊ टुले, विकास खळदकर, मालन दोरगे शिवसेना तालुकाप्रमुख देविदास दिवेकर, शिवसेना डॉ. सेल प्रमुख प्रमोद रंधवे, काँग्रेसचे विठ्ठलराव दोरगे, विठ्ठलराव खराडे ,शिवसेना उपतालुकाप्रमुख विजयसिंह चव्हाण, नवनाथ जगताप, रमाकांत निवंगुणे, सदाभाऊ लकडे, युवा सेना समन्वय समिर भोईटे विभागप्रमुख  चंद्रकांत भणभणे, डॅा.अशोक फडतरे व सर्व शिवसेना पदाधिकारी उपस्थितीत  होते.