‘देवीला’ जाणाऱ्या महिलांच्या गळयातील दागिने दरोडा टाकून लुटण्याचा तयारीत असणारे 4 ‘दरोडेखोर’ जेरबंद, बारामती पोलिसांची धाडसी कारवाई

बारामती : बारामती तालुक्यात महिलांच्या अंगावरील दागिने दरोडे टाकून लुटण्याचे प्रकार वाढत असताना बारामती शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करत दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या दरोडेखोरांना जेरबंद केले आहे.

पिन्या उर्फ अमर सुनील सोनवणे, हर्षद उर्फ हर्ष्या राजू बागवान (काकडे), अमोल राजू कांबळे (सर्व रा.कोअर हाऊस पोस्ट ऑफिस जवळ आमराई बारामती) व (दोन अनोळखी इसम नाव पत्ता माहित नाही) अशी दरोडेखोरांची नावे असून कल्याण हौसराव खांडेकर (पोह. बारामती शहर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या कारवाईने महिला भगिनींमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २८/०९/२०२२ रोजी पहाटे ४:३० ते ०५:१५ च्या दरम्यान निरा कॅनॉल जवळील भाजप कार्यालयाच्या समोर झाडाखाली अंधारात नमुद आरोपी हे अंधारात लपुन माळावरची देवी येथे दर्शनासाठी जाणाऱ्या येणाऱ्या महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने दरोडा टाकुन लुटण्याचे तयारीत होते.

यावेळी बारामती शहर पोलिसांनी त्यांना शिताफिने पकडले त्यावेळी आरोपिंजवळ लोखंडी कोयता, रॉड, चाकु, दोर, चिकटपटटी व मिरची पुड असे दरोडा टाकण्याचे साहित्य मिळुन आले. सदर घडटनेचा तपास सपोनि वाघमारे हे करीत आहेत.