दौंड : सहकारनामा ऑनलाईन
यवत ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने दि.27 सप्टेंबर रोजी 77 जणांचे स्वॅब पाठविण्यात आल्यानंतर त्यामध्ये 77 पैकी 09 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एकट्या यवतमध्ये 6 तर भांडगाव 1, बोरीपार्धी 1 आणि वाळकी 1 असे एकूण 9 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 05 पुरुष आणि 04 महिलांचा समावेश असून सर्वांचे वय हे 12 ते 65 दरम्यान असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी अहवालामध्ये नमूद केले आहे.