दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
दौंड शहरातील कोरोना बाधितांच्या संपर्कातील संशयितांची तपासणी केली असता बहुतांशी लोकांचा अहवाल सध्या निगेटिव्ह येत असला तरी आजही रोज दोन-तीन कोरोना बाधित रुग्ण शहरात आढळतातच आहेत. त्यामुळे दौंड करांनी आणखीन सतर्क राहण्याची आवश्यकता भासत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाने दिनांक 14 ऑगस्ट रोजी 74 संशयितांचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले होते, त्याचा अहवाल आज रोजी प्राप्त झाला आहे .
अहवालानुसार 74पैकी फक्त 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 26 ते 34 वयोगटातील चार पुरुष रुग्णांना नव्याने कोरोना ची लागण झाली आहे. शहरातील बेथल कॉलनी परिसरातील एक व राज्य राखीव पोलीस दलातील तीन जवानांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.
शहरातील संसर्गाची साखळी अजूनही पूर्णपणे तुटलेली नाही त्यामुळे ही ही साखळी तुटावी यासाठी दौंड करांनी आणखीन सतर्क राहून संसर्गापासून दूर राहण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या उपाय योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. कोरोना वरील विजय खूप जवळ आला असल्याची लक्षणे सध्या दिसू लागली आहेत.