Categories: Previos News

केडगाव चोरट्यांच्या रडारवर : केडगावमध्ये पुन्हा जबरी चोरी, फ्लॅट फोडून सुमारे 4 लाख 23 हजारांचे दागिने लंपास



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील केडगाव येथे २६ जानेवारीच्या पहाटे पुन्हा एकदा जबरी चोरीची घटना घडली असून या चोरीमध्ये सुमारे ४ लाख २३ हजारांचे दागिने चोरीला गेले आहेत.

याबाबत सुमित सुनील कोळेकर (रा. तुलसी छाया अपार्टमेंट केडगाव, ता.दौंड) यांनी फिर्याद दिली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार त्यांची पत्नी हि माहेरी गेली असून ते स्वतः काही कामानिमित्त बारामती येथे गेले होते. त्यावेळी २५ जानेवारी रात्री ते २६ जानेवारी पहाटेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी ते राहत असलेल्या तुलसीछाया अपार्टमेंट येथील सी विंग फ्लॅट नंबर ३०३ च्या दाराचा कड़ी, कोयंडा कशाने तरी तोडुन  आतमध्ये प्रवेश करून घरफोडी केली.

या घरफोडीमध्ये १लाख किमतीचा २.५ तोळे वजनाचा एक सोन्याचा राणीहार १ लाख ९६ हजार ४०० रुपयांचा ४.९१ तोळे वजानाचा एक सोन्याचा गंठण, ८० हजार रुपयांच्या २ तोळे वजनाच्या कानातील कुडया, ८० हजार रुपायांचे २ तोळे वजनाचे कानातील झुमके, ३ हजार रुपये किमतीचे ४ भार वजानाचे पायातील पैंजण असे एकूण ४ लाख २३ हजार रुपयांचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले आहेत. या घटनेचा अधिक तपास सहा.पोलीस निरीक्षक धनंजय कापरे करीत आहेत. 

गेल्या दोन दिवसांपूर्वीच चोरट्यांनी महाराष्ट्र बँकेचे रिटायर मॅनेजरच्या घरी दरोडा टाकून जबरी चोरी केली होती. त्या अगोदर तुलसी छाया अपार्टमेंटला लागूनच असलेल्या दत्तपार्क येथेही सशस्त्र चोरट्यांनी येऊन फ्लॅट फोडण्याचे प्रयत्न केले होते. हे सर्व प्रकार पाहता आता चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला नसल्याची चर्चा नागरिक करू लागले आहेत. या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago