Categories: राजकीय

दौंड मधील बहुचर्चित ‘तिसऱ्या’ कुरकुंभ मोरीचे काम प्रगतीपथावर,खा. सुप्रिया सुळे यांकडून कामाची पाहणी

दौंड

दौंडच्या नागरिकांसह राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत राहिलेल्या येथील तिसऱ्या कुरकुंभ मोरी (भुयारी मार्ग ) चे काम 7 ते 8 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता प्रगतीपथावर आले आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे,भाजपचे आमदार राहुल कुल, मा. आमदार रमेश थोरात यांनी या कामासाठी आपापल्या परीने संबंधित विभागांकडे पाठपुरावा केल्याने, तब्बल 16 कोटी 50 लाख रू खर्चाची ही कुरकुंभ मोरी लवकरच दौंड करांसाठी उपलब्ध होणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे.
या कुरकुंभ मोरी कामाचा सर्वात महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे मोरी साठी बनविण्यात आलेले काँक्रीटचे बॉक्स रेल्वे मार्गा खाली पुशिंग करणे. आणि याच कामासाठी रेल्वे प्रशासनाने दौंडकर नागरिक व ठेकेदाराला ही खूपच मोठी प्रतिक्षा करावयास लावली. मात्र अंतिमतः रेल्वे प्रशासनाने या कामासाठी आवश्यक असणाऱ्या या मार्गावरील मेगा ब्लॉक ला परवानगी दिली. आणि म्हणूनच बॉक्स पुशिंग कामाला सुरुवात झाली. याच कामाची पाहणी करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आज (दि.23 मे) येथे आल्या होत्या. यावेळी मा. आमदार रमेश थोरात,,वैशाली नागवडे,आप्पासो.पवार, सोहेल खान, गुरुमुख नारंग, वीरधवल जगदाळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस दौंड शहर व तालुक्यातील पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित होते.
या कामाची पाहणी केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे प्रशासन, कामाचे ठेकेदार राजेंद्र उगले तसेच सर्व कामगारांचे मनापासून आभार मानले. यावेळी रेल्वे हद्दीतील झोपडपट्टी धारकांनी सुळे यांची भेट घेतली व ताई आमची घरे पाडू देऊ नका अशी विनंती केली त्यावर ताईंनी त्यांना शब्द दिला की कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमची घरे पाडली जाणार नाहीत, तुम्ही निर्धास्त रहा. नवीन कुंभारी मोरी साठी आवश्यक असणाऱ्या रस्ता कामाविषयी जिल्हाधिकारी यांच्याशी बोलणी करून तो प्रश्नही मार्गी लागणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

13 मि. ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago