कोरोना योद्ध्यांना कला शिक्षकाने दिली 3D रांगोळीतून सलामी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

सध्या कोरोना संसर्गजन्य महामारीने आपले उग्ररूप धारण केले आहे. मात्र या जागतिक  महासंकटातही आपल्या प्राणाची, आपल्या मुलबाळांची पर्वा न  करता  देशासाठी आपल्या समाजाला  वाचवण्यासाठी अभूतपूर्व  लढा देणाऱ्या या नऊ भारतीय  महायोद्धयांना वरवंड येथील रहिवासी असणारे शिक्षक सुभाष नारायण फासगे, (कलाशिक्षक भैरवनाथ शिक्षण मंडळ, खुटबाव ता. दौंड जि.पुणे) यांनी आपल्या 12×8 फुटाच्या 3D रांगोळीतून एक आगळी वेगळी सलामी दिली आहे. फासगे सरांनी या रंगोळीमध्ये सैनिक, डॉक्टर, पत्रकार पोलीस, शेतकरी, नर्स, माल वाहतूक , ऍम्ब्युलन्स ड्राइव्हर, रेशनींग, किराणा दुकानदार, साफसफाई कामगार यांचे रेखाचित्र रेखाटले असून त्यांच्या या रांगोळीला संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसंती मिळत आहे.
पहा व्हिडीओ ://youtu.be/xMWydgaUTys