यवत’ला कोरोनाचा मोठा झटका, या 3 गावांतीलही पुन्हा ‛इतकेजण’ पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील यवत हे कोरोनाच्या बाबतीत अतिशय जागरूक असे गाव समजले जात होते त्यामुळे या गावात शक्यतो कोरोनाचे कुठेतरी दुर्मिळ असे रुग्ण सापडत होते. मात्र काही दिवसांपासून यवतमध्येही मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण सापडू लागले असून आज एकाच दिवसात तब्बल 6 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण एकट्या यवतमध्ये आढळून आले आहेत.

त्यामुळे आता यवतकरांनी जास्त जागरूक राहण्याची वेळ आली असून याबाबत यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी माहिती दिली आहे.

डॉ.इरवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमध्ये 6, पाटसमध्ये 1, केडगावमध्ये 1, आणि बोरीऐंदी मध्ये 1 असे एकूण 9 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. 

एकूण 62 रुग्णांची तपासणी करण्यात आली होती त्यापैकी या 4 गावांतील हे 9 जण पॉझिटिव्ह आढळून आले असून यामध्ये 8 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश आहे. हे सर्वजण 15 ते 67 या वयाचे आहेत.