दौंड : सहकारनामा ऑनलाइन
यवत पोलिसांनी मुळा-मुठा नदीच्या पात्रामध्ये केलेल्या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
दिनांक 25/11/2020 रोजी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशनचे पोलीस पथक आणि महसूल कर्मचारी पथकाने मिरवडी (ता.दौंड) गावच्या हद्दीत टकलेवस्ती येथे मुळा मुठा नदी पात्रात अवैधरित्या बेकायदेशीर वाळू उपसा करून पर्यावरणास हानी पोहचविणाऱ्या 5 यांत्रिक फायबर बोटी उधवस्त केल्या आहेत.
याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दौंड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला जात आहे. त्याच पद्धतीने आता पोलीस आणि महसूल पथकाने संयुक्तरित्या कारवाई सुरू केल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. अशीच कारवाई होत राहिली तर दौंड तालुक्यातील वाळू माफियांचा वाढता प्रभाव नक्कीच कमी होईल अशी आशा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.
सदरची कारवाई हि पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक ल डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पो कॉ हेमंत कुंजीर, पो कॉ सोमनाथ सुपेकर, पो कॉ किरण तुपे, पो कॉ विजय आवाळे व महसूल कर्मचारी पुंडलिक केंद्रे, तलाठी मिरवडी श्री.अभिमन्यू जाधव, अर्जुन स्वामी यांचे पथकाने केली आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहा पोलिस निरीक्षक धनंजय कापरे हे करत आहे.