दौंड : सहकारनामा ऑनलाइन
वाखारी ते देशमुखमळा प्रधानमंत्री ग्राम सडक हा रस्ता ठेकेदाराने केलेल्या नित्कुष्ठ कामामुळे 35 लाख रुपये वाया जाण्याची शक्यता असल्याचा आरोप येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर उर्फ शेखर मोरे यांनी केला आहे.
याबाबत त्यांनी अधिक माहिती देताना
या कामासाठी जिल्हा परिषद पुणे अंतर्गत 35 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. काम जुन 2020 ला चालु झाले. मात्र त्यावेळी पाऊस पडत होता परंतु तरीही पाऊस पडत असतानाच काम चालु होते. ग्रामस्थांकडून पाऊस संपेपर्यंत काम करु नये असं वारंवार सांगण्यात येत होते. तरीही काम चालुच होते. आणी त्यानंतर ज्याची भिती ग्रामस्थांना वाटत होती शेवटी तेच झाले. अवघ्या तीनच महिन्यांत रस्ता उखडण्यास सुरवात झाली.
रोडची साईडपट्टी तर फक्त बिल काढण्यासाठीच भरलीय की काय अशी शंका येते कारण ती अशी भरलीय जशी रांगोळी टाकली आहे असेही मोरे यांनी सांगत प्रशासनास आमची विनंती आहे की रोडची क्वालिटी कंट्रोलकडुन लवकरात लवकर ग्रामस्थांच्या समक्ष पाहणी करुन सदरील रोडवर ठेकेदाराकडून पुन्हा रस्ता दुरुस्त करून एक लेअर टाकून घ्यावा अशी मागणी त्यांनी शेवटी केली आहे.