थेऊर : सहकारनामा ऑनलाईन
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लाॅकडाऊन केल्यानंतर अनेक मजुरांना आपापल्या गावी परतण्याची इच्छा होती. दररोज काम करुन आपला उदरनिर्वाह चालवत असलेले दुसऱ्या राज्यातील मजूर आपल्या मूळ गावी परतण्याची वाट पाहत होते. वाघोली येथे काम करणाऱ्या अशा 341 कामगारांना मध्यप्रदेशात पोहोचवण्यासाठी आज शासनाच्या मदतीने विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली.
वाघोलीचे मंडल अधिकारी किशोर शिंगोटे व गांव कामगार तलाठी लाखे यांनी शासनाकडे नियमानुसार या कामगारांना गावी पाठवण्यासाठी पाठपुरावा करुन 341 कामगार व मजुर आज मध्यप्रदेशकडे रवाना करण्यात आले. वाघोली येथुन त्यांना पी.एम.पी.एल.च्या माध्यमातुन 15 बसेसची उपलब्धता करुन पुणे रेल्वे स्टेशन पर्यंत प्रवासाची सोय केली. केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना पुणे ते मध्यप्रदेश पर्यंत पोहचविण्याची विशेष जबाबदारी घेतली. यासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव मानकर आणि सर्व पोलीस यंत्रणा , आरोग्य विभाग , जि.प.सदस्य ज्ञानेश्वर कटके , मा.जि.प.सदस्य रामदास दाभाडे , पं.स. सदस्य सर्जेराव वाघमारे , मा.सरपंच शिवदास उबाळे , मा.उपसरपंच समिर आबा भाडळे , मा.उपसरपंच रामकृष्ण सातव , ग्रामपंचायत सदस्य सुधिर भाडळे , महेंद्र भाडळे , सागर गोरे , चिराग सातव , बाळासाहेब गोरे , तसेच ग्रा.पं.कर्मचारी आणि सेवाभावी संस्था आणि ग्रामस्थांनी जेवण व पाणी व्यवस्था करुन त्यांना निरोप दिला. या कामगारांनी आपली ही व्यवस्था केल्या बद्दल सर्व शासकीय यंत्रणा व सामाजिक संघटनांचे आभार मानले.