Categories: Previos News

शब-ए-बारात निमित्त मुस्लिम बांधवांकडून सुपे गावात 340 गरजू कुटुंबियांना अन्न,धान्य, किराणा वाटप



: सहकारनामा ऑनलाईन

बारामती तालुक्यातील सुपे येथे हजरत ख्वाजा शाहमन्सूर दर्गा वक्फ कमिटीचे वतीने सर्वधर्मीय ३४० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले. शब-ए-बारात ही मुस्लीम धर्मीयांमध्ये प्रार्थना करण्याची अतिशय पवित्र रात्र समजली जाते.  शब-ए बारात चे औचित्य साधून कुटुंबियांना घरपोच किराणा साहित्य वाटण्यात आले. कोरोनाच्या आलेल्या संकटामुळे गरजु कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्णय देवस्थान कमिटीने घेतला होता तसेच महाराष्ट्रातील अनेक दर्गा, मस्जिद ट्रस्टनेही असाच उपक्रम राबवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच शब-ए-बारातच्या रात्री नमाज व प्रार्थना सर्वांनी आपआपल्या घरामध्येच करावी व प्रशासनाला आपल्यापासून कोणतीही अडचन येवू देऊ नये याची खबरदारी घ्यावी अशी विनंती शाहमन्सूर दशा वक्फ कमेटीचे मुख्य विश्वस्त युनुसभाई कोतवाल यांनी केली. याप्रसंगी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे, बारामती पं.स. सभापती सौ.निताताई बारवकर, मार्केट कमिटीचे सभापती शौकतभाई कोतवाल, दर्गा कमेटीचे मुख्य विश्वस्त यूनुसभाई कोतवाल, सरपंच सौ. स्वातीताई हिरवे, ग्रा.वि.अधिकारी दादासाहेब लोणकर हे मान्यवर उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago