Categories: Previos News

उरुळी कांचनमध्ये 34 वर्षीय तरुणाची आत्महत्या



लोणीकाळभोर : सहकारनामा : हनुमंत चिकणे

उरुळी कांचन (ता. हवेली ) येथे एका चौतीस वर्षीय तरुणाने गळफास घेतल्याची घटना शुक्रवारी (ता. ०८) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. 

विशाल विठ्ठल मूल्या (वय- ३४ रा.उरुळी कांचन, ता. हवेली ) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. 

याप्रकरणी त्याचे नातेवाईक माधव वासू मूल्या (वय- ४०, रा. डाळिंब रोड, उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव मूल्या यांचा उरुळी कांचन येथील डाळिंब रोड येथे गॅरेजचा व्यवसाय आहे. शुक्रवारी (ता. ०८ ) ते गॅरेजवर काम करीत असताना अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या  पत्नीने त्यांना फोनकरून विशाल मूल्या हा हे दारू पिऊन घरी आले आहेत आणि घरामधील एका खोलीमध्ये जाऊन झोपले आहेत असे सांगितले.

दरम्यान संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माधव यांची पत्नी लावंण्या हिने विशाल यास चहा करून दिला. चहा झाल्यानंतर पुन्हा विशाल खोलीमध्ये जाऊन झोपला. सहा वाजण्याच्या सुमारास लावंण्या ही विशाल यास उठवायला गेल्या असता दरवाजाला आतून कडी लावली होती. 

आवाज दिला परंतु आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे लावंण्याने पती माधव यांना गॅरेजवरून बोलावून घेतले. माधव यांनी घरी आल्यानंतर जोरात दरवाजा ढकलला असता विशाल याने दोन टॉवेलच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. पुढील तपास  पोलीस हवालदार सचिन पवार करीत आहेत.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago