Categories: Previos News

बारामतीमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 33 जण ताब्यात तर 9 लाख 70 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

बारामती : सहकारनामा ऑनलाईन

माळेगाव (ता.बारामती) येथे बेकायदा सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारून १ कार, ७  दुचाकी आणि जुगाराच्या साहित्य असे मिळून सुमारे ९ लाख ७० हजारांचा  मुद्देमाल जप्त केला आहे. यावेळी येथे उपस्थित असणाऱ्या ३३ जणांवरही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार हि कारवाई बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या पथकाने केली असून त्यांना बातमीदारामार्फत  माळेगाव (ता.बारामती) हद्दीत असणाऱ्या रमाबाई नगर याठिकाणी रमण गायकवाड हा अनधिकृत पत्त्यांचा जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी धाड मारली असता त्यांना रमण गायकवाड याच्यासह ३३ जन मिळून आले त्यावेळी पोलिसांनी येथे कारवाई करत ७ दुचाकी,१ कार पत्त्या खेळण्यासाठी लागणारे जुगार साहित्य असे ९ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या सर्व आरोपींवर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या कारवाईमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांसह पोलीस उपनिरीक्षक संदीप गोसावी, पोलीस हवालदार सुरेश भोई, रमेश केकान, आप्पा दराडे, वैभव साळवे, गणेश काटकर, राहुल लांडगे, दत्तात्रय गवळी यांनी भाग घेतला होता.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

1 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago