दौंड : सहकारनामा ऑनलाईन(विनोद गायकवाड)
पुणे जिल्ह्यातील रोटी (ता.दौंड) या गावाने व्हाट्सएप ग्रुप च्या माध्यमातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मदत स्वरूपी पैसे जमा करत इतर गावांपुढे आदर्श ठेवलाय. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करण्याचे आवाहन या ग्रुपच्या माध्यमातून करण्यात आले होते. या आवाहनाला ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद देत तब्बल 33 हजार 301 रुपायांचा निधी अवघ्या काही दिवसातच गोळा करून रोख रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी मुंबई कोवीड19 यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहेत. व्हाटसएपग्रुपचा चॅटिंग पुरता वापर न करता असाही वापर करू शकतो जणू हा संदेशच रोटी ग्रामस्थांनी दिलाय,साधारण नऊशे लोकसंख्या असलेल्या या गावाने वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक मदतीचा हात अर्थसहाय्य म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी हा निधी जमा केला,गावातील सर्वच ग्रामस्थ, तरुण मुले यांच्यामुळे हा निधी उभा राहीला, आपण ज्या समाजात राहतो तिथे आपण आपले काम करत असताना किंवा जीवन जगत असताना समाजाबद्दल काहीतरी करण्याची आपली जबाबदारी असते आपण आपल्याकडील थोडं अर्थसहाय्य दिल्याने समाजातील सर्वांच भल होत असते या उदात्तहेतून या छोट्याश्या गावातून व्हाट्सएपच्या माध्यमातून तब्बल 33 हजार 301 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात आले आहेत.