वेळेचे महत्व जाणणारा नेता म्हणजे ‛हर्षवर्धन पाटील’, कार्यकर्ते साखर झोपेत असतानाच हर्षवर्धन पोहोचले उदघाटनाला अण.. कार्यकर्त्यांची उडाली तारांबळ

सहकारनामा : सागर जगदाळे

भिगवण : 
बऱ्याच वेळा आपण पाहतो की नेते मंडळी उद्घाटन कार्यक्रम असो की इतर कोणत्याही प्रकारचे राजकीय कार्यक्रम असो पण वेळेला कधीच हजर होत नाही.त्यांची वाट बघत बसणारे कार्यकर्ते मात्र वेळेला हजर असतात.साहेब वेळे वर येतील या अपेक्षेने बरेच जण हातातले काम सोडून कार्यक्रमाला मात्र वेळेत हजर.पण नेताच मात्र वेळ पाळत नाही.उपाशीतापाशी,भर उन्हात,पावसात कशाचीच तमा न बाळगता कार्यकर्ता मात्र वेळेला हजर आपल्या नेत्याची एक झलक पाहण्यासाठी.
मात्र काही नेते मात्र याला अपवाद असतात.इंदापूर तालुक्याचे भाजपा नेते हर्षवर्धन पाटील हे मात्र दिलेल्या शब्दाला व वेळेला किंमत देणारे नेते आहेत हे त्यांनी आजच्या प्रसंगातून दाखवून दिले.
निमित्त होते इंदापूर तालुक्यातील  तक्रारवाडी येथील चायनिज हट  या हॉटेलच्या उद्घाटनाचे. भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी उद्घाटनासाठी वेळ दिलेली होती सकाळी ७:३० ची. बऱ्याच कार्यकर्त्यांना वाटले की एवढ्या सकाळी सकाळी हर्षवर्धन पाटील उद्घाटनासाठी येतील की नाही. म्हणून कार्यकर्ते अजून साखर झोपेतच होते. मात्र दिलेल्या वेळेपेक्षा आधी ५ मिनिटे म्हणजे सकाळच्या ७ वाजून २५ मिनिटांनी हर्षवर्धन पाटील व त्यांच्या निवडक कार्यकर्त्यांचा ताफा उद्घाटन स्थळी दाखल झाला. यावेळी वाघ कुटुंबियांचे सदस्य सोडता मोजकेच कार्यकर्ते हजर होते. नंतर मात्र कार्यकर्त्यांची तारांबळ सुरू झाली. पण हर्षवर्धन पाटील हे वेळेचे किती काटेकोरपणे पालन करतात हे त्यांनी आजच्या प्रसंगातुन दाखवून दिले. सकाळी बरोबर ७ वाजून ३० मिनिटांनी चायनीज हट चे उद्घाटन करून व सर्वांची ख्याती खुशाली विचारून हर्षवर्धन पाटील पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले.
या उद्घाटन प्रसंगी मारुती वणवे,कर्मयोगी कारखान्याचे नूतन संचालक पराग जाधव,विश्वास देवकाते,संजय देहाडे. प्रशांत वाघ (मा.उपसरपंच तक्रारवाडी) पोपट वाघ, मोहन वाघ, भिगवणचे सरपंच तानाजी वायसे, मदनवाडी गावचे उपसरपंच रणजित निकम, तेजस देवकाते, संपत बंडगर, आण्णा आढाव, रामभाऊ जाधव, विकास वाघ, तात्या आढाव बाळा भोसले, ऍड. स्वप्नील जगताप,सुनील वाघ सुनील काळे,अभिनव वाघ, सूरज पोपट वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.

Team Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago