चिंताजनक – संपूर्ण दौंड तालुक्यात आज 317 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण जाणून घ्या कोणत्या गावात किती रुग्ण!



– सहकारनामा

दौंड : सध्या दौंड तालुका हा कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला आहे. काल दि.16 एप्रिल रोजी 225 कोरोना बाधित रुग्ण सापडले होते तर आज दि  17 एप्रिल रोजी दौंड उपजिल्हा रुग्णालय, यवत कोविड सेंटर आणि स्वामी चिंचोली कोविड सेंटर असे एकूण 317 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची धक्कादायक माहिती अहवालात समोर आली आहे. 

त्यामुळे सध्या दौंड तालुक्यात नागरिकांनी स्वतःची काळजी घेणे हि काळाची गरज बनली आहे. आज यवत आणि स्वामी चिंचोली कोविड सेंटरच्या  अहवालात खालील गावे आणि त्यापुढे पॉझिटिव्ह आढळून आलेले रुग्ण पाहून हा आकडा कसा वाढत चालला आहे हे स्पष्ट होत आहे.





दौंड शहरातही कोरोना रुग्ण सापडत असून आज दि.17 एप्रिल रोजी नव्याने 54 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. एकूण 221 रुग्णांची चाचणी हि दौंड उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली होती. त्यापैकी 54 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले तर 167 जण निगेटिव्ह आले आहेत. याबाबतची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ इरवाडकर यांनी दिली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 38 पुरुष आणि 16 महिला आहेत. तर त्यांचा विभाग खालील तक्त्यामध्ये नमूद केल्याप्रमाणे आहे.