– सहकारनामा
दौंड :
दौंड तालुक्यामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. दौंड तालुक्यातील ग्रामिण आणि शहरी भागातही कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर सापडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.
आज दि.5 एप्रिल रोजी दौंड उपजिल्हा रुग्णालयात 316 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 90 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. याबाबतची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे खालील भागातील आहेत.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 61 पुरुष आणि 29 महिलांचा समावेश आहे.