मुंबई : सहकारनामा ऑनलाईन
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील लॉकडाउन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. त्यामुळे आता 30 जून नंतर लॉकडाउन वाढणार की हटणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
देशात आणि राज्यात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढतच चालला आहे. त्यामुळे सरकारला हे निर्णय घेणे गरजेचे बनले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनेतला आवाहन केल होत की अजूनही काळजी घेणे गरजेचं आहे. कोरोनाचं संकट अजून संपलेलं नाही. सध्या आपण सर्वजण आर्थिक अडचणीत सापडलो असल्याने आर्थिकतेला गती देण्यासाठी मिशन बिगेन अगेन सुरु करतोय. पण लॉकडाउन उठणार नसून सुरुच राहणार आहे असे सांगितले होते. त्यानंतर आता सरकारने 31 जुलैपर्यंत राज्यातील लॉकडाउन वाढवला आहे. याबाबत राज्यातील कंटेंटमेंट झोनमध्ये लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार, 31 जुलैपर्यंत हा लॉकडाउन वाढविण्यात आला असून मिशन बिगेन अगेन नुसार टप्प्याटप्प्याने सेवा सुरूळीत करण्यात येणार आहेत. मात्र, शासनाचा आदेश येईपर्यंत हा लॉकडाउन आणि केवळ अत्यावश्यक सेवा व ज्या गोष्टींमध्ये सूट देण्यात आली आहे त्याच फक्त सुरु राहणार आहेत.