दौंड शहर ‛ऑल इज वेल’च्या मार्गावर… तब्बल 309 रुग्णांची कोरोनावर मात



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

शहरातील कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका व पोलिस यंत्रणांनी ज्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी केलेली होती त्या प्रयत्नांना चांगले यश मिळाले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

आज पर्यंत शहरातील ३६६ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली होती परंतु कोवीड सेंटर मधील योग्य उपचारानंतर त्यापैकी तब्बल ३०९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. हे प्रशासनाचे यश मानले जात आहे. परंतु  शहरातील सतरा रुग्णांचा कोरोना मुळे झालेला मृत्यू सुद्धा दौंड करांना वेदना देऊन गेला हे ही विसरता येणार नाही.

दि.१२ ऑगस्ट पर्यंत कोरोना रुग्णां बाबत, उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संग्राम डांगे यांनी पुढील प्रमाणे माहिती दिली आहे.

आज पर्यंत शहरातील कोरोना बाधित रुग्णांच्या  संपर्कात आलेल्या एकूण ३१२१ (राज्य  राखीव पोलीस दल, गट क्र.७-७४८/ राज्य राखीव पोलीस दल, गट क्रमांक ५-४३७/IRB-११७/ शहर १५२८/ SDH स्टाफ-१३/ ग्रामीण-२७८)) संशयितांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यापैकी ३६६ जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे तर तब्बल २७५३ जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आला.३६६ बाधित रुग्णांपैकी सध्या फक्त ४० रुग्ण उपचार घेत आहेत तर ३०९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज पर्यंत एकूण १७ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असून दोन रुग्णांचा कोरोना अहवाल प्रलंबित असल्याची ची माहिती डॉ.डांगे यांनी दिली आहे.