भरधाव ‛कार’ ने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा नदीत पडून मृत्यू, कार चालक फरार.. मात्र गाडीचा नंबर मिळाला

 

दौंड : दौंड तालुक्यातील दहिटने या गावाच्या हद्दीत असणाऱ्या मुळा-मुठा नदीच्या पुलावर एका स्विफ्ट डिझायर कार चालकाने भरधावपणे येऊन दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील इसमाचा नदीत पडून मृत्यू झाला आहे. या अपघातानंतर चारचाकी वाहन चालक वाहनसह फरार झाला असून त्याच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हि घटना दि.15 ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मुळा मुठा नदीच्या पुलावर घडली आहे. स्विफ्ट डिझायर कार नं.एम. एच.१३/ए.झेड/९७०५ वरील अज्ञात चालकाने ही कार हयगईने, अविचाराने, रहदारीचे नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून युनीकॉर्न मोटार सायकल नं.एम. एच.१२/ एस.एन/६३१० या दुचाकीला पाठीमागुन जोरात धडक देऊन हा अपघात केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या अपघातात विठठल बापु थोरात, (वय ४९ वर्षे) यांच्या डोक्यास, हात-पायास लहान मोठया दुखापती होवून ते मुळा मुठा नदीचे वाहते पाण्यात पडून त्यांचा मृत्यू झाला आहे.
हा अपघात घडल्यानंतर कार चालक हा अपघाताची खबर न देता निघून गेला असल्याने त्याच्या विरुद्ध फिर्यादी बापू बाळासाहेब लांडगे (व्यवसाय मासेमारी, रा.दहिटने ता.दौंड.पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यवत पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.