300 दिव्यांगांची मोफत तपासणी करून आ.राहुल कुल यांच्या हस्ते त्यांना UDID आणि अपंगत्व प्रमाणपत्राचे मोफत वाटप



दौंड : सहकारनामा

आपल्या संकल्पनेतून जागतिक दिव्यांगत्व दिनाच्या औचित्यावर दौंड शहर व तालुक्यातील  सुमारे ३०० हुन अधिक दिव्यांग बांधवाची अपंगत्व तपासणी करून त्यांना अपंगत्व प्रमाणपत्र तसेच UDID कार्डचे मोफत वाटप करण्यात आले. 

या मोहिमेची सुरुवात दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते आज रविवार दि.14 मार्च रोजी करण्यात आली. यावेळी काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात UDID व प्रमाणपत्र आज देण्यात आले. या कार्यक्रमावेळी आमदार राहुल कुल यांनी शासनाच्या विविध योजना, सवलतींचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक असणारे अपंगत्व प्रमाणपत्र व UDID कार्ड मिळवून देतानाच दिव्यांग बंधू भगिनींच्या विविध अडी अडचणी शासनदरबारी मांडू असे आश्वासन उपस्थितांना यावेळी दिले.

कार्यक्रम प्रसंगी  सिल्विर ज्युबिली उप जिल्हा रुग्णालयाचे  डॉ. दिनेश वानखेडे , दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. विठ्ठल शेंडकर, अपंग संघटनेचे श्री. बाळासाहेब नानवर, श्री. माउली अण्णा ताकवणे, श्री. दादासाहेब केसकर, श्री. हरिभाऊ ठोंबरे, श्री. बाळासाहेब तोंडे पाटील, श्री. सुखदेव चोरामले आदी तसेच परिसरातील दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित होते.