Categories: क्राईम

2 आरोपिंकडून 6 मॅगजीन सह 30 गोळ्या, 3 गावठी पिस्टल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पुणे : खेड राजगुरूनगर येथील 2 आरोपिंकडून 30 गोळ्या, 6 मॅगजीन आणि 3 गावठी पिस्टल असा शस्त्रसाठा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि.२०/११/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या आदेशाने खेड राजगुरुनगर या परिसरात पेट्रोलिंग करत असताना दोन इसम काळया रंगाच्या बुलेट गाडीवरून शिरोली बाजूकडून किवळे जात असून त्यांचेकडे गावठी बनावटीचे पिस्टल असल्याची माहिती या पथकाला समजली. सदर बातमीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन बुलेट गाडीवरील २ इसमांना ताब्यात घेतले.

आरोपिंनी त्यांची नावे १) आकाश आण्णा भोकसे वय २३ वर्षे (रा. कुरकुंडी ता खेड जि पुणे) २) महेश बाबाजी नलावडे (वय. २३ वर्षे रा कुरकुंडी ता खेड जि पुणे) अशी असल्याचे सांगीतले. यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता आकाश भोकसे याच्या कंबरेला खोचलेले २ लोंखडी गावठी पिस्टल मॅकझीनसह मिळून आले तर त्याच्या पॅन्टच्या खिशात २ मॅकजीन जिवंत काडतुसे भरलेल्या मिळून आल्या. तसेच त्याचा मित्र महेश नलावडे याच्या कंबरेला १ गावठी पिस्टल मॅकझीनसह मिळून आले तर त्याच्याही पॅन्टच्या खिशात १ जिवंत काडतुसे भरलेली मॅकझीन मिळून आली. सदरील दोन्ही आरोपिंकडून ३ गावठी पिस्टल आणि ३ मॅकझीन प्रत्येकी ५ जिवंत काडतुसे भरलेल्या आणि पिस्टल मधे प्रत्येकी ५ जिवंत काडतुसे भरलेली अवस्थेत मिळून आली.

आरोपिंकडून एकूण १ लाख ६१ हजारांचा किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदरील आरोपिंविरूद्ध सरकारतर्फे आर्म ॲक्ट ३, २५ नुसार खेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील आरोपी यांना मुद्देमाल सह पुढील तपास कामी खेड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले.

सदरील कारवाई ही शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स पो नी नेताजी गंधारे, पो स ई शिवाजी ननवरे,
पो स ई गणेश जगदाळे, पो हवा विक्रमसिंह तापकीर, पो हवा विजय कांचन, पो ना अमोल शेडगे, पो ना बाळासाहेब खडके, पो शि धिरज जाधव, पो शि निलेश सुपेकर, पो शि दगडू वीरकर यांच्या पथकाने केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

18 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago