पुणे : सहकारनामा ऑनलाइन
‛बारामती’मध्ये अवैध गुटखा व्यापाऱ्यांवर आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली असून यामध्ये सुमारे 30 लाख रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इसम नामे संतोष गायकवाड (रा.वसंतनगर, बारामती आणि हरी नवले, रा शिक्षक सोसायटी, कसबा, बारामती) हा बारामती शहरामध्ये गुटख्याच्या मोठा साठा करून तो गुटखा बारामती शहरात आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये, खेड्यापाड्यात मोठ्या प्रमानात सप्लाय करत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांना मिळाली होती. त्यांनी याबाबत त्या इसमांची आणि त्यांच्या गोडाऊनची माहिती घेऊन त्या ठिकाणी छापा टाकण्यासाठी बारामती क्राईम ब्रँचचे प्रमुख पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने बारामती शहरात कसबा आणि वसंतनगर भागात जाऊन गोपनीय रित्या माहिती घेऊन बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस जवान आणि बारामती पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि पोलीस जवान यांच्या पथकाने छापा टाकला असता या दोन्ही ठिकाणी हरी दगडू नवले हा विमल, महेक, गुलाम छोटा विमल,xxx,कारगिल, RMD नावाचा 29 लाख 99 हजार 700 रुपये किमतीचा गुटखा बेकायदेशीररित्या बाळगून त्याची विक्री करताना मिळून आला. त्याने सदरचा माल हा संतोष लक्ष्मण गायकवाड (रा.वसंतनगर, बारामती) याचा असल्याचे पंचासमक्ष सांगितले. त्याचे कसबा येथील गोडाऊन मधून 18लाख 99हजार 700 रुपयांचा तर वसंतनगर येथील गोडाऊन मधून 11लाख रुपयांचा माल त्याचे ताब्यातून जप्त करण्यात आला. याबाबत अन्न आणि औषध प्रशासन, पुणे यांना कळविले असून आरोपी संतोष लक्ष्मण गायकवाड, (रा.वसंतनगर, बारामती)
हरी दगडू नवले (रा शिक्षक सोसायटी, कसबा, बारामती) या दोन आरोपींविरुद्ध बारामती शहर येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. सदरची कामगिरी ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील सो, बारामती अप्पर पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती क्राईम ब्रँचचे
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, बारामती क्राईम ब्रँचचे पोलीस जवान सुरेंद्र वाघ, संदीप जाधव, स्वप्निल अहिवळे, शर्मा पवार, विशाल जावळे चालक भाऊसो मोरे, बारामती शहर पोलीस स्टेशनचे सपोनि सचिन शिंदे, पोलिस जवान गणेश नांदे, सिद्धू पाटील, राजेश गायकवाड, रामदास जाधव यांनी केली आहे.