बारामतीमध्ये 30 वर्षीय पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या



बारामती : सहकारनामा ऑनलाईन

बारामती शहरामध्ये पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सोमवारी सायंकाळी घडली आहे. 

आत्महत्या करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव तुषार सानप असे असून ते 30 वर्षाचे होते. तुषार यांनी शहरातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असून सायंकाळी त्यांनी आत्महत्या केल्याचे समजताच शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तुषार यांचा मृतदेह पाहून त्यांनाही  अश्रू अनावर झाले. दोन वर्षांपासून ते शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होते . त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही