केडगावमधील ‛त्या’ 3 मोरांचा (Peacock death) अखेर मृत्यू, या कारणामुळे ‛मृत्यू’ झाल्याचा प्राथमिक अंदाज!



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील केडगाव परिसरामध्ये असणाऱ्या धुमळीचा मळा येथे दोन दिवसांपूर्वी झाडावर बसलेले तीन मोर (Peacock) जमिनीवर कोसळून जायबंदी झाल्याची घटना घडली होती.

आज त्या तिन्ही मोरांचा मृत्यू (Peacock death) झाला असून तिन्ही मोरांचे मृत्यू हे विषबाधेने झाले असावेत असा प्राथमिक अंदाज शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांकडून वर्तविला जात असल्याची माहिती वन मंडल अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी हे तीन मोर (peacock)

केडगाव (धुमळीचा मळा) येथे झाडावरून अचानक खाली पडून जायबंदी झाले होते. तेथील शेतकऱ्यांनी या मोरांना वन अधिकाऱ्यांच्या हवाली केले होते.

आज दि.2 फेब्रुवारी रोजी पुन्हा त्याच पद्धतीने अजून एक मोर जायबंदी अवस्थेत आढळला असून या तीन मोरांप्रमाणेच त्याचीही अवस्था झालेली आहे. मोरांसोबत होणाऱ्या या घटनांमुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे. या तीन मोरांचा मृत्यू जर विषबाधेने झाला असेल तर या मोरांना नेमकी कशातून विषबाधा झाली हे शोधनेही गरजेचे बनले आहे.  

मोरांचा मृत्यू जर विषबाधेने झाला असेल तर ती विषबाधा नेमकी कशातून झाली हे लवकरच अहवालातून समोर येईल आणि याचा उलगडा होईल अशी माहिती वन परिमंडल अधिकारी चैतन्य कांबळे यांनी सहकारनामा शी बोलताना दिली आहे.