Categories: Previos News

खुनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपी ताब्यात, पुणे ग्रामीण LCB पथकाची कामगिरी



पुणे : सहकारनामा 

दिनांक २७/१/२०२१ रोजी दुपारी १२.०० वा.चे सुमारास वडकी, विजय हॉटेल समोरील हिंदवी स्नॅक्स सेंटर ता.हवेली जि.पुणे येथे तुषार खंडु चव्‍हाण (वय २१ रा.वडकी, गायदरा ता.हवेली जि.पुणे) व त्याचा मित्र फिर्यादी शुभम बापु पवार (वय २१ वर्ष रा.वडकीनाला, ता.हवेली जि.पुणे) असे चहा पित बसले असताना आरोपी अमोल उर्फ पप्या विष्णू जाधव, अमित उर्फ दत्ता विष्णू जाधव, कालीदास उर्फ सागर मल्हारी जाधव (सर्व रा.गायदरा वडकी ता.हवेली जि.पुणे) व इतर एक अनोळखी यांनी जुन्या घरगुती भांडणाच्या कारणावरून चिडुन त्यांचेकडील मोटार सायकलवरून येवुन फिर्यादीस पाठीमागुन धरून त्याचेकडील चाकु फिर्यादीचे पोटाला “तु हलायचा नाय, नायतर तुला मारून टाकील” अशी धमकी देवुन यातील आरोपीत क्र.१ याने कोयत्याने, आरोपी क्र.२ याने लोखंडी राॅडने व आरोपी क्र.३ याने चाकुने मयताचे डोक्यात, पोटात वार करून त्याचा खुन केला होता.

याबाबत लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे भादंवि क.३०२, आर्म ॲक्ट कलम ४,२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा समांतर तपास पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली LCB टिम करीत असताना मिळालेल्या माहितीवरून आरोपी अमोल उर्फ पप्या विष्णू जाधव, अमित उर्फ दत्ता विष्णू जाधव, कालीदास उर्फ सागर मल्हारी जाधव यांना आळंदी फाटा, लोणीकंद येथून ताब्यात घेण्यात आलेले आहे. 

सदर आरोपींनी त्यांचा साथीदार मंगेश बाळासाहेब चव्हाण राहणार नांदोशी ता.हवेली जि.पुणे सध्या राहणार भेकराईनगर हडपसर पुणे याचेसह सदर गुन्हा केल्याचे सांगितले आहे. सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्यांना लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे ताब्यात दिलेले आहे.

सदरची कामगिरी ही पुणे ग्रामिण चे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, पुणे विभाग अपर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय अधिकारी अमृत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोसई रामेश्वर धोंडगे,

सफौ. राजेंद्र थोरात, पोहवा. महेश गायकवाड, पोहवा. निलेश कदम, 

पोहवा. सचिन गायकवाड, पोहवा. सुभाष राऊत, पो.ना. गुरु गायकवाड, पोहवा. मुकुंद आयाचीत, पोहवा. राजेंद्र पुणेकर

पोकॉ. प्रसन्न घाडगे, पोकॉ. समाधान नाईकनवरे यांनी केलेली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago