Categories: Previos News

दौंड मधील मळद येथील ’‛खुनासह दरोडा’ ‛मोक्का’ तसेच ‛दरोडा व 3 जबरी चोरी’ असे एकूण ५ गंभीर गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी अटक, पुणे ग्रामीण LCB शाखेची कामगिरी



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

दि.३०/३/२०२० रोजी रात्री ०१.२० वा.चे सुमारास मौजे मळद ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीत रेल्वे उड्डाणपुलाजवळ सोलापुर-पुणे हायवे रोडलगत ट्रक नं एमएच-२५ यु ४२०१ वरील चालक काशिनाथ रामभाऊ कदम वय ५५ वर्षे रा.ढोकी ता.कळंब जि.उस्मानाबाद हे ट्रक रोडचे कडेला लावून लघवीसाठी गेले असता लघवी करुन परत येत असताना सब रोडने पायी येणारे पाच ते सहा अनोळखी इसमांनी त्यांचे छातीवर चाकूने वार करुन त्याचे जवळील रोख रक्कम तीन हजार रुपये, ड्रायव्हींग लायसन्स, एक पांढरे रंगाचा मोबाईल तसेच त्याचे अगोदर त्याच ठिकाणी थांबलेला टेम्पो नं एमएच-१२ एचडी १३११ वरील क्लीनर महंमद मेहबुब पठाण वय ४९ वर्षे रा.उस्मानाबाद याचे खिशातील सँमसंग कंपचा मोबाईल व त्याच वाहनावरील ड्रायव्हर अल्ताफ खैयुम पटेल याचे खिशातील रोख २०००/- रुपये, ड्रायव्हींग लायसन्स व पाकीट असा एकुण किमत रु ७०००/- रु. चा माल जबरीने चोरुन नेला होता. सदर घटनेत ट्रक ड्रायव्हर काशिनाथ रामभाऊ कदम वय ५५ वर्षे रा.ढोकी ता.कळंब जि.उस्मानाबाद यांना औषधोपचारास घेवुन जात असताना ते मयत झाले व टेम्पो क्लीनर महंमद मेहबुब पठाण हे जखमी होता. सदरबाबत ट्रकचा क्लीनर शकील आयुब शेख वय ३५ रा.कसबे तडवळा ता.जि. उस्मानाबाद यांनी फिर्यादी दिलेवरून दौंड पो.स्टे. गु.र.नं.१४९/ २०२० भादंवि क.३९५, ३९६, ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा करताना आरोपींनी कोणताही पुरावा मागे न ठेवल्याने गुन्हा उघडकीस आणणे हे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते.

 सदर आव्हानात्मक गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास LCB शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली LCB पथकाने करून गोपनीय बातमीदारामार्फत माहिती काढून गुन्हा केलेले अज्ञात ५ आरोपी निष्पन्न करून त्यांचेकडून एकूण २ दरोडा, ५ जबरी चोरी व २ चोरी असे ९ गुन्हे उघडकीस आणलेले होते.  सदर गुन्हयात यापूर्वी आरोपी १) गणेश अजिनाथ चव्हाण वय २२ वर्षे रा.बोरावकेनगर, दौंड ता.दौंड जि.पुणे.

२) समीर उर्फ सुरज किरण भोसले वय १९ वर्षे रा . गोपाळवाडी-पाटस रोड, दौंड ता.दौंड जि.पुणे 

३) देवगण अजिनाथ चव्हाण वय २३ रा.बोरावकेनगर, दौंड ता.दौंड जि.पुणे.

४) अक्षय कोंडक्या चव्हाण वय २५ रा.लिंगाळी ता.दौंड जि.पुणे  यांना अटक केलेली असून गुन्हयास मोक्का कलम लावण्यात आलेले होते. गुन्हा घडलेपासून आरोपी नामे नेपच्युन उर्फ नेपश्या पिजारो काळे वय ३४ रा.राक्षसवाडी ता.कर्जत जि.अहमदनगर हा फरार होता. तेव्हापासून LCB पथक त्याचे मागावर होते. 

सदर आरोपी हा पोलीसांचे भितीने चाकण जि.पुणे, माळशिरस जि.सोलापूर, श्रीगोंदा, राक्षसवाडी, मिरजगाव,  ता.कर्जत जि.अहमदनगर, पाटोदा जि.बिड येथे रानावनात राहून वारंवार ठिकाणे बदलून पोलिसांना गुंगारा देत होता. 

आज दि.१४/१०/२०२० रोजी LCB पथकास तो मिरजगाव ता.कर्जत जि.अहमदनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी वेशांतर करून स्थानिक पोलीसांचे मदतीने कोबींग ऑपरेशन करून पाहिजे आरोपी नेपच्युन उर्फ नेपश्या पिजारो काळे (वय ३४ रा.राक्षसवाडी ता.कर्जत जि.अहमदनगर) यास ताब्यात घेतलेले आहे. सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन त्यास दौंड पो.स्टे. चे ताब्यात देत आहोत. 

सदर कामगिरी मा.पोलीस अधीक्षक डॉ. श्री.अभिनव देशमुख सो.,  अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग श्री.मिलींद मोहिते सो. यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व पथकातील पो.हवा. महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, पो.नाईक गुरू गायकवाड, सुभाष राऊत तसेच श्रीगोंदा पो.स्टे.चे पोहवा. अंकुश ढवळे यांनी केलेली आहे.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

20 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago