Categories: Previos News

पेट्रोल, डिझेल चोरणार्‍या आंतरराज्य टोळीतील 3 जण LCB कडून जेरबंद, 16 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त



पुणे : सहकारनामा

पुणे जिल्ह्यातील पेट्रोल पंपातून पेट्रोल, डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील तिघांना ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

आरोपींकडून 1 ट्रक, 2 कॅन, मेटल कटर पान्हा, पाईप, मोबाईल असा 16 लाख 28 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

श्रीराम लाला  काळे (वय 19), दशरथ भीमा काळे (21), नाना गोविंद पवार (56), (सर्व रा. तेरखेडा, जि. उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.  जिल्ह्यात पंपावरील पेट्रोल आणि डिझेल चोरीचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अशा गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला विशेष पथक नेमून कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख सो यांनी दिले होते. 

या आदेशानुसार पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी पथक तयार केले होते. या पथकाने इंधन चोरीबाबतच्या गुन्ह्यांची माहिती घेतल्यानंतर ट्रान्स्पोर्ट व्यवसायातील टोळी पेट्रोल, डिझेल चोरी करीत असल्याचे स्पष्ट झाले होते. 

शिवाय, सर्व संशयित वारंवार ट्रकमधून माल घेऊन पुणे बाजूकडे  येत असल्याचेही स्पष्ट झाले होते. आज रोजी विशेष पथकाला माहिती मिळाली होती की संशयित हे तेरखेडा ता वाशी जी उस्मानाबाद येथील  असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने तेरखेडा ता वाशी  येथील  फाट्यावरील एका पंपाची टेहळणी करताना 3 जण  दिसून आले. त्यांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.

यावेळी वरील आरोपींनी पेट्रोल पंपावरून पेट्रोल, डिझेल चोरी केल्याची कबुली दिली आहे. सदरच्या आरोपींकडून खालिल  गुन्हे उघडकीस आले आहेत 

१) इंदापूर पो स्टे गु र नं ११९७/२०२० भा द वी 379 

२) इंदापूर पो स्टे  गु र नं १०३३/२०२० भा द वी 379

३) वालचंदनगर पो स्टे ५१५/२०२०  भा द वी 379

४) नातेपुते पो स्टे गु र नं ३७१/२०२० भा द वी 379 

५), अकलूज पो स्टे गु र नं ४४९/२०२०  भा द वी 379 वरील सर्व गुन्ह्यात मिळून 17 हजार 718 लिटर डिझेल असे एकून 13 लाख 40 हजार रु किंमतीचे चोरी केले आहे.

सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक श्री डॉ अभिनव देशमुख सो अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली  स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट , पो स ई शिवाजी ननावरे 

सहा फो  दत्तात्रय गिरमकर, पो हवा अनिल काळे, पो हवा रविराज कोकरे, पो हवा उमाकांत कुंजीर, पो हवा काशीनाथ राजपुरे, पो ना विजय कांचन, पो ना अभिजित एकशिंगे, पो ना जनार्दन  शेळके

पो ना राजू मोमिन, पो कॉ धिरज जाधव यांनी केली आहे. 

सदरच्या गुन्ह्यातील आरोपी दशरथ  भीमा माने  (वय 21 वर्षे)  याचेवर  यापूर्वी

 १) रामदुर्ग पो स्टे गु र नं 228/18 भा द वी 379

२) खानापूर पो स्टे 197/18

 भा द वी 379

३) राम दुर्ग पो स्टे 235/18

भा द वी 379

4) भेल गोल कर्नाटक पो स्टे 136/18

भा द वी 379 

5)शंखेश्वर पो स्टे 

गु र नं 264/18 

भा द वी 379

6) बार्शी पो स्टे  188/19 

भा द वी 457 

7) मिरज पो स्टे  8/2019 

भा द वी 379 ,34

8) तासगाव पो स्टे  366/18 

भा द वी 379,  तसेच सांगली जिल्ह्यात डिझेल चोरी बाबतचे इतर 8 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

23 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

2 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

2 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

3 दिवस ago